Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
मुंबई : शिवसेनेचं ऑपरेशन टायगर हे यशस्वी झालं असून काही तांत्रिक अडचणींमुळे त्याचे पुरावे समोर आणले नाहीत, मात्र ठाकरेंचे कायदेशीर डावपेच बघूनच पुढची पावलं टाकली जातील, असं शिंदेंच्या शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आलं आहे. तशी माहिती सूत्रांनी दिली. येत्या दोन दिवसात तरी अधिकृतरित्या काहीही समोर आणलं जाणार नाही, अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. राज्याच्या राजकारणात…