Last Updated:
कल्याण डोंबिवली आणि खाली बदलापूर, अंबरनाथपर्यंत महावितरणचं जाळं आहे. पण, पाऊस नुसता पडला तरी विज पुरवठा खंडीत होतो.
कल्याण : एकीकडे महावितरणकडून स्मार्ट मिटर लावण्यासाठी मोहिम राबवली जात आहे. ग्राहकांचा विरोध असूनही स्मार्ट मिटर बळजबरीने बसवले जात आहे. पण, सोई सुविधा देण्याच्या बाबतीत महावितरणचा कारभार बोंबाबोंब सुरू आहे. कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथमध्ये वीज पुरवठा खंडीत करण्याचा महावितरणने आज रेकॉर्ड केला आहे. दिवसभर शहरवासियांना अंधारात ठेवलं. अखेरीस रात्री उशिरा वीज पुरवठा सुरळीत झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
कल्याण डोंबिवली आणि खाली बदलापूर, अंबरनाथपर्यंत महावितरणचं जाळं आहे. पण, पाऊस नुसता पडला तरी विज पुरवठा खंडीत होतो. त्यातच आज शुक्रवार असल्यामुळे हमखास लोडशेडिंग ठरलेली असते. पण, आज दुपारपासून वीज पुरवठा खंडीत झाला तो रात्रीपर्यंत कायम होता. कल्याण आणि डोंंबिवलीमधील ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडीत होता.
– कल्याण आणि डोंबिवली शहराची बत्तीगुल, दोन्ही शहरात अंधारामय वातावरण pic.twitter.com/boVKhPVHsM
— News18 Marathi (@News18_marathi) July 17, 2026
पडद्या मधून येणारे आणि पाल सबस्टेशनला विद्युत पुरवठा करणारे अतिउच्च दाब वाहिनी ट्रिप झाल्यामुळे कल्याण डोंबिवली शहराचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. दिवसभर महापारेषणाकडून युद्धपातळीवर काम सुरू होतं. विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यात येईल, असं वारंवार सांगितलं जात होतं, अखेरीस रात्री उशिरा वीज पुरवठा पुर्ववत झाला आहे, अशी माहिती महापारेषण विभागाने दिली.
महापारेषांच्या भिवंडी पडगा पाल लाईनमध्ये बिघाड झाल्याने तब्बल ४ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. यामध्ये डोंबिवलीमधील दोन लाख उल्हासनगर मधील सव्वा लाख तर बदलापूर शहरातील २५ हजार ग्राहकांना फटका बसला, वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी लाईनचे पेट्रोलिंग करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. महापारेषण कंपनीच्या अतिउच्च दाबाच्या २२० केव्ही पडघा-पाल वीजवाहिनीमध्ये संध्याकाळी ७.४५ वाजता अचानक तांत्रिक बिघाड झाला होता. या बिघाडामुळे आनंदनगर, पलावा, पाल आणि डोंबिवली या अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा ठप्प झाला होता. सुमारे ३०० मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली. याचा फटका बदलापूर, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर परिसरातील सुमारे ४ लाख २० हजार ग्राहकांना बसला.
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
Jul 17, 2026 10:52 PM IST
Dombivali: लाईट आली रे! कल्याण-डोंबिवलीमध्ये अखेर वीज पुरवठा पुर्ववत, महावितरणच्या ‘स्मार्ट’ कारभाराचा फटका
