Omraje Nimbalkar: पुण्यातून ओमराजेंच्या ‘मातोश्री’ म्हणाल्या; रात्री घरीच होते, सकाळी जीमला जातो म्हणून घराबाहेर गेले


पुणे : शिवसेनेतील (Shivsena) ऑपरेशन टायगरमुळे राजकीय वर्तुळात भूकंप झाला असून ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदार फुटल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे जाऊन आपला स्वतंत्र गट स्थापन केल्याचे सांगण्यात येते. त्यामध्ये, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांचेही (Omraje nimbalkar) नाव असून ओमराजे निंबाळकर हे रात्रीच पुण्यावरुन खासगी विमानाने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. मात्र, ओमराजे निंबाळकर हे रात्री घरीच होत, सकाळी जीमला जातो म्हणून ते घराबाहेर पडले आणि परत आले नाहीत, अशी माहिती ओमराजे यांच्या मातोश्रींनी पुण्यातील (Pune) घरातून दिली. 

खासदार ओमराजे निंबाळकर हे पुण्यात असल्याची माहिती होती, त्यामुळे एबीपी माझाच्या प्रतिनिधीने थेट ओमराजेंचे भाऊ ज्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहतात तिथे जाऊन विचारणा केली. त्यावेळी, ओमराजे यांच्या आईने दरवाजा उघडला. ओमराजे रात्री इकडेच होते, सकाळी जिमला म्हणून घराबाहेर पडले आणि ते घरी आलेलेच नाहीत, अशी माहिती त्यांच्या आईने दिली. त्यामुळे, नॉट रिचेबल असलेले किंवा माध्यमांसमोर न आलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांची भूमिका नेमकी काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. 

ओमराजेंनी फोन उचलला नाही – सुषमा अंधारे

ऑपरेशन टायगर सुरू झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुलगा रुग्णालयात दाखल असल्याने पुण्यात असलेले खासदार ओमराजे मध्यरात्रीच पुण्यातून दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बोलताना शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, ओमराजेंना मी सकाळी फोन केला, पण माझा फोन त्यांनी उचलला नाही. मग मी त्यांच्या पाठीशी भावासारखे, सावलीप्रमाणे सोबत असणाऱ्या आमदार कैलासदादा पाटील यांना फोन केला. ते म्हणाले, ताई मी दुसऱ्यांची गॅरंटी कशी देऊ, मी माझी गॅरंटी देऊ शकतो. त्यामुळे कैलास पाटलांच्या बोलण्यातील संधिग्धता बरीचशी बोलकी आहे, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली. तसेच, तानाजी सावंत यांच्याकडेच ओमराजेंची जबाबदारी होती, असेही त्यांनी सांगितले. 

तानाजी सावंत पुण्यात लीड करत होते

ओमराजेंना दिल्लीला नेण्यासाठी काल रात्री पुण्यात चार्टर विमान आलं, तेव्हा आमदार तानाजी सावंत त्याला लीड करत होते, असा गौप्यस्फोटही सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेतून केला. तसेच, ओमराजे निंबाळकर समोर येऊन का सांगत नाहीत, याचे उत्तर त्यांनी द्यायला हवं. नानासाहेब पाटील, जयराजे निंबाळकर आणि ओमराजे निंबाळकर हे चार्टर्ट विमानात होते, तानाजी सावंत त्यांना लीड करत होते, जे स्वत: चार्टर्ड विमानात होते, अशी माहिती देखील सुषमा अंधारे यांनी दिली. दिल्लीतील हॉटेल मान्सूनमध्ये 10 तारखेला यासंदर्भात बैठक पार पडली होती, प्रत्येकाने आपल्या आपल्या महत्त्वाकांक्षा बघून निर्णय घेतला, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटलं.  

हेही वाचा

ओमराजेंना पुण्यातून दिल्लीला नेलं, चार्टर्डमध्ये तानाजी सावंतांचा पुढाकार; 10 तारखेलाच दिल्लीत बैठक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *