SIR In Maharashtra : 2002 च्या SIR यादीत आई-वडील, आजी आजोबांची नाव कशी शोधायची? खुप किचकट आहे, पण ‘या’ ट्रिकमुळे 2 मिनिटात सापडेल | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

फॉर्म भरताना सगळ्यात किचकट गोष्ट म्हणजे 2002 च्या मतदार यादीत तुमचे आई-वडील,आजी-आजोबा यांचे नाव शोधणे?आणि त्यांची माहिती फॉर्ममध्ये भरणे. आता 2002 च्या मतदार यादी आणायची कुठून आणि नाव शोधायची कुठे असा प्रश्न अनेक मतदारांना पडला आहे.

SIR 2002 list name how to find out
SIR 2002 list name how to find out

SIR 2002 list parents and grandparents names how to find: राज्यासह देशभरात मतदार याद्यांचे विशेष सखोल परिक्षण (SIR) सूरू आहे. यामध्ये बुथ लेव्हल ऑफिसर (BLO) तुम्हाला एक फॉर्म देणार आहेत, जो फॉर्म तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून भरून सबमिट करायचा आहे. हा फॉर्म भरताना सगळ्यात किचकट गोष्ट म्हणजे 2002 च्या मतदार यादीत तुमचे आई-वडील,आजी-आजोबा यांचे नाव शोधणे?आणि त्यांची माहिती फॉर्ममध्ये भरणे. आता 2002 च्या मतदार यादी आणायची कुठून आणि नाव शोधायची कुठे असा प्रश्न अनेक मतदारांना पडला आहे.पण तुम्ही जर ही ट्रीक वापरली तर तुमचं काम चुटकीसरशी होणार आहे.

2002 च्या मतदार यादीमध्ये आई-वडील,आजी-आजोबा यांचे नाव शोधण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या प्लेस्टोरवर जायचंय आहे आणि त्यात ECINET हा ॲप Install करायचा आहे. या ॲपवरून तुम्ही तुमचा फॉर्म ऑनलाईनही भरू शकता. पण ऑनलाईन फॉर्म भरताना तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि वोटर आयडीवर नाव सेम असणे गरजेचे आहे. त्यात नावाच जर छोटीशी चुक जरी असेल तर ते शक्य होणार नाही आहे.

आता आपण मुळ विषयाकडे येऊ यात.ECINET ॲप ओपन केल्यावर तुम्हाला अनेक पर्याय मिळतील त्यात तुम्हाला Search Your name in last SIR या पर्यायावर क्लिक करायचं आहे.ते केल्यानंतर BY Elector Details आणि In last SIR E Roll असे पर्याय येतील. यामध्ये जर तुमच्याकडे 2002 च्या आधीच वोटर आयडी असेल तर तुम्ही BY Elector Details च्या पर्यायावर क्लिक करून खाली दिलेली पोलिंग स्टेशनपासून, मतदार संघ आणि पार्ट सिरिअल नंबर यासह इतर सगळ्या गोष्टी भरून तुम्ही 2002 च्या यादीत नाव तपासू शकतात.

जर तुमच्या कडे 2002 आधीचं वोटर कार्ड नाही आहे तर तुम्हाला In last SIR E Roll या पर्यायावर क्लिक करायचे आहे. तिथे तुम्हाला पहिल्यांदा राज्य निवडायचं आहे.राज्य निवडल्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा. हा जिल्हा निवडताना तुम्हाला तुमचा जूना जिल्हा निवडायचा आहे. (उदा: वसई विरार आधी ठाणे जिल्ह्यात यायचं पण आता जिल्हा पालघर आहे. तर तुम्हाला तुमचा जुना ठाणे जिल्हा टाकायचा आहे.)

जिल्हा टाकल्यानंतर तुम्हाला तुमच मतदार संघ निवडायचा आहे.त्यानंतर तुम्हाला Polling station No and name हा पर्याय दिसेल. या पर्यायात तुम्हाला तुमच्या शहरातील पोलिंग स्टेशन नंबर आणि नाव दिले असेल. त्यामुळे तुमचा एरिया पाहून तुम्हाला त्या पोलिंग स्टेशनवर क्लिक केल्यावर VIEW बटन दाबताच तुमची यादी दिसणार आहे.आता ही यादी दिसल्यावर त्यात तुमचं नाव शोधा.

जर तुम्हाला फक्त एरीया माहिती आहे आणि नंबर लक्षात नसेल तर यादीमध्ये दिलेल्या तुमच्या एरीयावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या बिल्डींगचे नाव शोधून देखील तुम्ही तुमच्या आई वडिलांचा किंवा आजी आजोबांचा तपशील शोधू शकता. हा तपशील तुम्हाला 2002 च्या यादीतील नातेवाईकांची नावे या फॉर्ममधील कॉलममध्ये भरायचा आहे.

खर तर ही खुप किचकट गोष्ट आहे. पण तुम्हाला या अॅपद्वारे सहज शोधता येईल.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

SIR In Maharashtra : 2002 च्या SIR यादीत आई-वडील, आजी आजोबांची नाव कशी शोधायची? खुप किचकट आहे, पण ‘या’ ट्रिकमुळे 2 मिनिटात सापडेल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *