Baramati: उच्च शिक्षणाचं स्वप्न अर्धवट राहिलं, कॉलेजला गेलेल्या हर्षदाच्या मृत्यूमुळे अख्खं गाव हळहळलं | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

बारामती तालुक्यातील  मोरगाव–सुपे मार्गावर शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हर्षदा जनार्दन खैरे (वय २०)  असं मयत तरुणीचं नाव आहे. 

News18
News18

बारामती : बारामती तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात आलेल्या एका २० वर्षीय विद्यार्थिनींना अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकने पाठीमागून दुचाकीला धडक दिली. या अपघातात २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील  मोरगाव–सुपे मार्गावर शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हर्षदा जनार्दन खैरे (वय २०)  असं मयत तरुणीचं नाव आहे.  हर्षदा खैरे हिने सोमेश्वरनगर येथील महाविद्यालयात डिप्लोमा शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुढील डिग्री प्रवेशासाठी हर्षदा आणि तिची मैत्रीण महाविद्यालयात आली होती. मॅकेनिकल डिप्लोमाचे अंतिम वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणाच्या प्रवेशासंदर्भात काम आटोपून दोघेही आपल्या गावी परतत होत्या.

भरधाव ट्रकने दिली धडक

हर्षदा दुचाकीवरून घरी जात होती, त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिली. ट्रकची धडक बसल्यामुळे दोघ्याही जणी रस्त्यावर फेकल्या गेल्या. यामध्ये गंभीर दुखापत झाल्यामुळे हर्षदाचा जागेवरच मृत्यू झाला. स्थानिकांनी धाव घेतली. घटनेची घटनेची माहिती मिळताच सुपे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अपघातानंतर काही काळ मोरगाव–सुपे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पुढील तपास सुरू केला असून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या/पुणे/

Baramati: उच्च शिक्षणाचं स्वप्न अर्धवट राहिलं, कॉलेजला गेलेल्या हर्षदाच्या मृत्यूमुळे अख्खं गाव हळहळलं



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *