Air Pollution : जीवनशैलीतले बदल, राहणीमानामुळे स्मृतिभ्रंशाचं प्रमाण कमी करता येणं शक्य, WHO नं सांगितली मार्गदर्शक तत्त्वं | लाइफस्टाईल बातम्या


Last Updated:

डिमेन्शियाचा धोका कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं यासाठी जीवनशैलीत काही बदल करण्याची शिफारस केली आहे. तंबाखू आणि मद्यपानापासून पूर्णपणे दूर राहा. याव्यतिरिक्त, सकस आहार घ्या, इतरांशी संवाद साधा आणि मन सक्रिय ठेवणाऱ्या उपक्रमांमधे सहभागी व्हा.

News18
News18

मुंबई : स्मृतिभ्रंशासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. आपण राहत असलेल्या घटकांचा जीवनशैली, राहणीमानातल्या प्रकृतीवर परिणाम होतो. सध्या वेगानं वाढत असलेल्या वायू प्रदूषणामुळे स्मृतिभ्रंशाचा धोका वाढण्याची शक्यता असते.

वायू प्रदूषणामुळे स्मृतिभ्रंशाचा धोका वाढण्याची शक्यता असली तरी, जीवनशैली आणि राहणीमानाच्या वातावरणात आवश्यक बदल केले, तर स्मृतिभ्रंशाचे रुग्ण कमी करता येऊ शकतात. स्मृतिभ्रंशाची म्हणजेच डिमेन्शियाची 45% प्रकरणं यामुळे टाळणं शक्य असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. स्मृतिभ्रंशामुळे, स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता आणि दैनंदिन कामं करण्याची क्षमता हळूहळू नष्ट होते.

डिमेन्शियाच्या सर्व प्रकरणांपैकी 60 ते 70 टक्के प्रकरणं ही अल्झायमरच्या आजारामुळे उद्भवतात. जगभरात पाच कोटी सत्तर लाखांहून अधिक जणांना डिमेन्शिया आहे आणि दरवर्षी सुमारे एक कोटी नवीन रुग्णांची नोंद होते.

भारतातही स्मृतिभ्रंशाचा धोका वेगानं वाढत आहे. संशोधनानुसार, भारतातील साठ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील सुमारे 88 लाख जण स्मृतिभ्रंशानं ग्रस्त आहेत.

वायुप्रदूषण एक प्रमुख धोका का ते समजून घेऊया. WHO च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमधे पहिल्यांदाच वायुप्रदूषणाला स्मृतिभ्रंशाचा एक प्रमुख धोकादायक घटक असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. दीर्घकाळापर्यंत प्रदूषित हवेत श्वास घेतल्यानं आपल्या संज्ञानात्मक क्षमतांवर म्हणजेच cognitive abilities वर विपरीत परिणाम होतो.

प्रदूषणामुळे स्मृतिभ्रंशाचा धोका वाढतो असं लॅन्सेट कमिशनच्या 2024 मधील अहवाल आणि बीएमजे पब्लिक हेल्थमधील एका अभ्यासातही आढळलं आहे. डिमेन्शियाचा धोका कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं यासाठी जीवनशैलीत काही बदल करण्याची शिफारस केली आहे. तंबाखू आणि मद्यपानापासून पूर्णपणे दूर राहा. याव्यतिरिक्त, सकस आहार घ्या, इतरांशी संवाद साधा आणि मन सक्रिय ठेवणाऱ्या उपक्रमांमधे सहभागी व्हा.

उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणं यांसारख्या समस्यांचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. ज्यांना ऐकण्यास त्रास होत आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानं श्रवणयंत्राचा वापर करणं फायदेशीर ठरू शकतं.

अनेक जण मेंदूचं आरोग्य जपण्यासाठी स्वतःहून जीवनसत्त्वं आणि ओमेगा-3 सप्लिमेंट्स घेतात, पण जागतिक आरोग्य संघटनेच्या मते असं करणं योग्य नाही. जोपर्यंत गरज नसेल तोपर्यंत ही सप्लिमेंट्स घेणंं टाळावं; कारण यामुळे स्मृतिभ्रंश होत नाही याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.

मेंदूशी संबंधित काही लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घेणं आवश्यक आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/

Air Pollution : जीवनशैलीतले बदल, राहणीमानामुळे स्मृतिभ्रंशाचं प्रमाण कमी करता येणं शक्य, WHO नं सांगितली मार्गदर्शक तत्त्वं



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *