Who Is Parag More : आयपीएल विजेता, रणजीपटू, सिलेक्टर ते फ्रँचायझी क्रिकेटचा ‘रॉयल’ कारभारी!
क्रिकेट खेळणं सोपं आहे… पण एखादी क्रिकेट टीम सांभाळणं प्रचंड कठीण काम. 2025 चा सीझन. मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या टी20 क्रिकेट लीगचा कार्यक्रम एकाच वेळी घोषित झाला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एमपीएलसाठी रायगड रॉयल्स या फ्रँचायझीनं महिला आणि पुरूष अशा दोन्ही गटात टीम उतरवल्या. पण दुसरीकडे याच फ्रँचायझीनं मुंबई टी20 लीगमध्येही एक टीम विकत घेतली….