मोदीजींची गेली 12 वर्ष ही सुरुवात, पुढील अनेक वर्षांपर्यंत भाजप आणि एनडीएची सत्ता राहणार : अमित शाह


Amit Shah: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 12 वर्ष फक्त सुरुवात होती. भारतीय जनता पक्ष आणि एनडीए सरकार अनेक वर्ष सत्तेत राहणार आहे. 2047 सालापर्यंत ‘पूर्ण विकसित भारत’ घडवण्याचे स्वप्न नक्की साकार करेल, असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. इचलकरंजीत पार पडलेल्या महायुतीच्या भव्य मेळाव्यात आणि सहकार परिषदेत ते बोलत होते. आगामी काळातही एनडीएचेच सरकार राहील आणि विकसित भारताचा हा संकल्प पूर्णत्वास नेईल, असे अमित शाह म्हणाले. त्यांनी मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळातील विविध विकासकामांचा आणि महत्त्वपूर्ण निर्णयांचा आढावा घेतला. या कार्यक्रमात सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या 95 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रदीर्घ कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या 100व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आपण पुन्हा इचलकरंजीला नक्की येऊ, असे आश्वासनही अमित शाह यांनी दिले. 

दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांची घोषणा 

इथेनॉल ब्लेंडिंगचे प्रमाण 1.5 टक्क्यांवरून 30 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा आणि इथेनॉलवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून थेट 5 टक्क्यांवर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रासाठी 3 हजार कोटींच्या मोठ्या घोषणा महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला आणखी ताकद देण्यासाठी अमित शाह यांनी दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यात भारत सरकारतर्फे 1500 कोटी रुपये खर्चून एक नवा सहकारी प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पामध्ये इथेनॉलवरील पुढील प्रक्रिया आणि सायट्रिक अॅसिडची निर्मिती होईल व यातून मिळणारा नफा थेट साखर कारखान्यांना दिला जाईल. पुण्यातील ‘नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह’मध्ये1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करून ते पुन्हा सुरू केले जाईल. याद्वारे देशभरातील साखर कारखाने आणि डेअरी प्रकल्पांसाठी लागणारी यंत्रसामग्री पुरवली जाईल, असे ते म्हणाले. 

घरात घुसून दहशतवादाला सडेतोड उत्तर

दहशतवाद आणि नक्षलवादाचा बीमोड काँग्रेसच्या 10 वर्षांच्या कार्यकाळावर टीका करताना अमित शाह म्हणाले की, त्यावेळी देशात सातत्याने बॉम्बस्फोट आणि दहशतवादी हल्ले होत होते, मात्र तत्कालीन पंतप्रधानांच्या तोंडाला कुलूप असायचे. याउलट नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेत आल्यावर, उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करत पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवादाला सडेतोड उत्तर दिले. काश्मीरला मुख्य प्रवाहात आणून तेथील सुरक्षा यंत्रणांवर मजबूत नियंत्रण मिळवणे, ईशान्य भारतात शांतता प्रस्थापित करणे आणि पाच दशकांचा जुना नक्षलवाद संपुष्टात आणून देशाला सुरक्षित करण्यात मोदी सरकारला मोठे यश आले आहे, असे शाह यांनी स्पष्ट केले.

पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमुळे.. 

सहकार आणि साखर उद्योगाला नवसंजीवनी कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमुळे संपूर्ण देश आज गोड खात असल्याचे ते म्हणाले. मोदी सरकारने सहकार क्षेत्रासाठी अनेक मोठे निर्णय घेतले असून, सहकारी साखर कारखान्यांच्या नफ्यावरील 46 हजार कोटी रुपयांचा आयकर रद्द करून त्यांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोनानंतर आर्थिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना NCDC द्वारे 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज वितरित करण्यात आले. सरकारने स्वतंत्र सहकार आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय स्थापन करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *