Nashik Rain Update: नाशिकवर मोठं संकट, गोदावरीला येणार महापूर; यावर्षी पहिल्यांदाच असं घडतंय! अंगावर शहारे आणणारा ड्रोन VIDEO | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

पावसाच्या पाण्यासह होळकर पुलाजवळून सुमारे 24 हजार क्युसेक प्रवाह वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.   

News18
News18

नाशिक : राज्यभरात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये मागील २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गोदावरी नदीला पूर आला आहे.  अनेक मंदिर, पूल पाण्याखाली गेली आहे. पण, परिस्थिती आणखी बिघडण्याची चिन्ह आहे.  यंदाच्या पावसाळ्यात गोदावरी नदीला सर्वात मोठा पूर येणार आहे.   संध्याकाळपर्यंत गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडणार आहे.

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मागील २४ तासांपासून विक्रमी पाऊस झाला आहे.  गंगापूर धरणातून सुमारे 3 हजार क्युसेक, तर दारणा धरणातून 15 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीपात्रातील पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सध्या गोदावरी नदीला पूर आला आहे. पण, आता   19 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्यास गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडते.   सध्या गंगापूर धरणातून सुमारे 12 हजार 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाच्या पाण्यासह होळकर पुलाजवळून सुमारे 24 हजार क्युसेक प्रवाह वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.   नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यास सराफ बाजार परिसरात पाणी शिरण्याची शक्यता आहे.

आधीच रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी गेलं आहे.  पावसाचा जोर कमी झाल्याने धोका काहीसा कमी आहे, पण परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.  सर्व यंत्रणा सतर्क असून आवश्यक ती खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे.

सराफ बाजारात पाणी शिरणार

दरम्यान,  नाशिकच्या गोदावरी पात्राचा स्तर वाढला आहे.  कश्यपी धरण 61 टक्के भरले आहे. मागच्या 24 तासात 1682 MCFT पाणी गंगापूर धरणात आले आहे.   सध्या 12600 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे.  गंगापूर धरण हे 97 टक्के भरले आहे. नदी नाल्यांमुळे होळकर नदीजवळ 7000 क्युसेसने पाणी येते आहे.  इशारा पातळी 13045 क्युसेस आहे तर धोका पातळी 19079 क्युसेस आहे.   त्यापुढे पाणी वाढल्यास सराफ बाजारात पाणी शिरते. सगळ्या विभागांकडून लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरू आहे साधारण 24000 क्युसेस पाणी साधारण 6 वाजेपर्यंत गोदाघाटावर येईल. नांदूर मध्यमेश्वरजवळ तीन गावांमध्ये लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन सूचना दिली आहे, अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी  दिली.

संध्याकाळी धोका वाढणार

कॅचमेंट एरियामध्ये पाऊस कमी झाला आहे. धोक्याच्या इशाऱ्याला आपण मॅनेज करू शकतो. सर्वाधिक 62000 क्युसेस पाणी आता पर्यंत सर्वाधिक सोडण्यात आले आहे, संध्याकाळी 6 वाजेपासून धोक्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचा अंदाज आहे दुपारी 3 वाजता नंतर कमी होईल, त्र्यंबकेश्वरमध्ये 194 MM पाऊस बुधवारी एका रात्रीत पडला.  गिरणा नदी पात्र वाढले आहे,  इगतपुरी, सुरगाणा मध्ये काही रस्ते बंद आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये 8 पर्यटकांवर घराचे पत्रे पडले होते, या दुर्घटनेत 3 जण जखमी झाले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

Nashik Rain Update: नाशिकवर मोठं संकट, गोदावरीला येणार महापूर; यावर्षी पहिल्यांदाच असं घडतंय! अंगावर शहारे आणणारा ड्रोन VIDEO



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *