ओमराजेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा प्रतिसाद; खासदार फोडाफोडीमागचं राज’कारण’ही सांगितलं, अमित शाहांनाही प्रत्युत्तर
मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje nimbalkar) हे शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून आहे. त्यासाठी, दिल्लीत जाऊन त्यांनी स्वतंत्र गटाला आपला पाठिंबा दिल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यातच, आज त्यांचे वडिल पनवराजे निंबाळकर हत्याप्रकरणाचा निकाल सीबीआय कोर्टाने दिला. त्यामध्ये, माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यामुळे, हा…