रेवती सुळेंच्या लग्नाला दिग्गजांची मांदियाळी; मोहन भागवत, राहुल गांधींसह दोन्ही ठाकरे कुटुंबीय, बॉलिवूड अन् उद्योगपती, पाहा यादी


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिचा लग्नसोहळा आज मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये होत आहे. भाजप आमदार आणि उद्योगपती अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानी यांच्यासोबत रेवती सुळेंची लग्नगाठ (marraige) बांधली जात आहे. अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. तर, सुप्रिया सुळेंचे जावई सारंग हे उत्कृष्ट बॅडमिंटनपटू असून त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही सहभाग घेतला आहे. या लग्नसोहळ्यास राजकीय, बिझनेस, कला, क्रीडा आणि बॉलिवूड विश्वातील सेलिब्रिटींचीही हजेरी दिसून आली. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan bhagwat) यांच्यासह देशभरातील दिग्गज राजकीय नेत्यांची लक्षणीय उपस्थिती होती. 

रेवती यांचे आजोबा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह जम्मू काश्मिरमधील नेते ओमर अब्दुल्ला, कन्निमोझी, आमदार जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, रोहित पवार यांच्यासह बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारही उपस्थित होते. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने लग्नसोहळ्यात डान्स केल्यानंतर, बिग बी अमिताभ बच्चन यांनीही सपत्नीक हजेरी लावली. तर, उद्योग क्षेत्रात जगभरात आपलं नाव कमावलेले देशातील दोन मोठे उद्योजकही सहकुटुंब लग्नसोहळ्यास हजर होते. मुकेश अंबानी, अनिल अंबानी यांच्यासह गौतमी अदानी हेही लग्नाला उपस्थित होते.   

लग्नसोहळ्यात कोण कोण उपस्थित? 

सरसंघचालक मोहन भागवत
काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे
हर्षवर्धन सपकाळ
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे
करण जोहर,
संदीपान भुमरे
पार्थ पवार, कायनात धार
सुनेत्रा पवार
तामिळनाडूचे माजी मंत्री ए.राजा
प्रतापराव पवारांचे कुटुंब
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह
राजेश टोपे, शशिकांत शिंदे
सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे 
खासदार निशिकांत दुबे
जय पवार, पत्नी ऋतुजा पाटील
खासदार बासुरी स्वराज 
आमदार धीरज देशमुख 
खासदार अमोल कोल्हे, 
पुर्वा वळसे पाटील, किरण वळसे पाटील 
अनुराग ठाकूर, आमदार श्रीकांत भारतीय
प्रफुल पटेल
मुकूल वासनिक
खासदार विशाल पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
शिवानी वड्डेटीवार, 
उद्धव ठाकरे कुटुंब
संजय राऊत कुटुंब
मंत्री नरहरी झिरवळ
अमिताभ बच्चन, जया बच्चन
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
सतेज पाटील, दिलीप वळसे पाटील
अभिनेता आणि खासदार रविकिशन
मंत्री पंकजा मुंडे
मुकेश अंबानी, नीता अंबानी
अनंत अंबानी सपत्निक
आमदार रोहित पाटील, 
खासदार अनिल देसाई, अतुल सावे
काँग्रेस पक्षाचे महासचिव के.सी.वेणूगोपाल
उद्योगपती आदर पुनावाला
गौतम अदानी, प्रीती अदानी
राज ठाकरे कुटुंबीय

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी 
अखिलेश यादव पंजाबचे

मुख्यमंत्री भगवंत मान

हेही वाचा

सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या लग्नात शाहरुख खानची जादू, सारंग लखानीसोबत भांगडा, रेवतीसोबत आयकॉनिक स्टेपवर डान्स, पाहा VIDEO



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *