ते माझं हक्काचं घर, मी कधीही तिथे..; निवेदिता सराफ यांच्याबद्दल स्पष्टच बोलली तेजश्री प्रधान – Marathi News | Tejashri pradhan opens up on bond with nivedita saraf said she can go anytime at her home to eat
काही नाती ही केवळ पडद्यापुरती मर्यादित राहत नाहीत, तर ती मनामनांत जपली जातात. अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि निवेदिता सराफ यांचं नातं हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेदरम्यान पडद्यावर सासू-सुनेची भूमिका साकारताना दोघींमध्ये निर्माण झालेला जिव्हाळा आजही तितकाच घट्ट आहे. आता निवेदिता सराफ ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेत कृष्णाईच्या भूमिकेतून झी मराठी वाहिनीवर पुनरागमन…