Last Updated:
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मीक कराड गेल्या दीड वर्षांपासून अटकेत आहे. जामीन मिळवण्यासाठी तो अनेक प्रयत्न करीत आहे.
बीड : जिल्ह्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मीक कराड याला सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. वाल्मिक कराड याने दाखल केलेली पुनर्विलोकन (रिव्ह्यू पिटीशन) याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मीक कराड गेल्या दीड वर्षांपासून अटकेत आहे. जामीन मिळवण्यासाठी तो अनेक प्रयत्न करीत आहे. जिल्हा सत्र न्यायालय, उच्च न्यायालयात त्याने अनेक कारणं सांगून जामिनासाठी प्रयत्न केले. परंतु त्याला जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे जामिनासाठी त्याने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे ठरवले. मात्र त्याने दाखल केलेली पुनर्विलोकन (रिव्ह्यू पिटीशन) याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
वाल्मिक कराड याच्या वतीने जामिनासाठी याचिका करण्यात आली होती, सर्वोच्च न्यायालयाने तीच याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने आधी जामिनासाठी नकार दिला, त्यानंतर कराडच्या वतीने पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने दिलास देण्यास नकार दिल्याने वाल्मीक कराड याला मोठा धक्का समजला जात आहे.
ज्या आदेशाचे पुनर्विलोकन मागितले आहे, त्यामध्ये नोंदींवरून स्पष्ट दिसणारी अशी कोणतीही त्रुटी नाही, ज्यामुळे त्यावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता भासेल. त्यामुळे न्यायालयाकडून याचिका फेटाळण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Bid (Beed),Bid,Maharashtra
Jul 17, 2026 10:39 PM IST
