Hind Al-Abbasi Viral News: सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?


Hind Al-Abbasi Viral News: इराकी सुरक्षा यंत्रणांनी हिंद अल-अब्बासी (Hind Al-Abbasi) या इराकी महिला राजकारण्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात प्रचंड संपत्ती जप्त केली आहे. सोशल मीडियावर काही फोटो आणि पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की 57 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे 490 कोटी रुपये) रोख रकमेसह 27 किलो सोनं सापडलं आहे. चक्क सोन्यापासून बनवलेले अंतर्वस्त्र (सोन्याची ब्रा आणि पँटी) सुद्धा पोलिसांना मिळाली. सोशल मीडियावर नोटांचे ढीग, सोन्याची बिस्किटे आणि या महागड्या वस्तूंचे फोटो जोडून हा दावा केला जात आहे. 

नेमकी वस्तुस्थिती काय आहे? (Fact Check)

इराक सरकारने भ्रष्टाचारी राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध एक मोठी मोहीम उघडली आहे. मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि सोने जप्त करण्यात आले आहे, तसेच अनेक जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे.

दाव्याला अधिकृत पुष्टी नाही

व्हायरल पोस्टमध्ये ही जप्ती थेट हिंद अल-अब्बासी यांच्या घरातून झाल्याचे म्हटले असले, तरी इराकी प्रशासनाने किंवा अधिकृत यंत्रणांनी याला अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही. व्हायरल होत असलेले सर्व फोटो किंवा जप्त केलेल्या वस्तूंची यादी थेट त्यांच्याशीच संबंधित आहे, असे कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही.

सोन्याच्या अंतर्वस्त्रांच्या (Gold Underwear) दाव्याचे सत्य 

या संपूर्ण बातमीमध्ये ‘सोन्यापासून बनवलेली अंतर्वस्त्रे’ सापडल्याचा दावा सर्वात जास्त व्हायरल होत आहे. मात्र, फॅक्ट-चेकर्स आणि रिपोर्ट्सनुसार, या दाव्याला कोणताही अधिकृत आधार किंवा पुरावा मिळालेला नाही. काही रिपोर्ट्सनुसार, हा दावा अत्यंत अतिशयोक्ती करून पसरवला गेला आहे किंवा त्याचा या प्रकरणाशी संबंध जोडण्यात आला आहे.

दुसऱ्या एका महिला खासदाराचे नाव चर्चेत

काही वृत्तांनुसार, इराकी खासदार आलिया नासिफ (Alia Nassif) यांच्या घरावरही सुरक्षा यंत्रणांनी छापे टाकले होते, जिथे अब्जावधी इराकी दिनार आणि सोने जप्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले सोन्याच्या अंतर्वस्त्रांचे फोटो हिंद अल-अब्बासी यांच्याऐवजी आलिया नासिफ यांच्या प्रकरणाशी संबंधित असू शकतात, असाही एक सूर आहे. परंतु, इराकी अधिकाऱ्यांनी या दाव्यालाही अद्याप अधिकृत मान्यता दिलेली नाही.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *