Mangal Gochar 2026 : मंगळ ग्रहाच्या संक्रमणाने 25 जुलैपर्यंत 4 राशींच्या कुंडलीत राजयोग; अवघ्या 24 तासांत पालटणार नशीब, राजासारखं जीवन जगाल


Mangal Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचं संक्रमण ही एक महत्त्वाची बाब मानली जाते. ग्रह जेव्हा आपल्या स्थितीत बदल करतात किंवा एखाद्या नक्षत्रात प्रवेश करतात तेव्हा त्याचा थेट परिणाम सर्व 12 राशींवर होतो. याच दरम्यान ऊर्जा आणि साहसाचं प्रतीक असलेला मंगळ ग्रहाचं संक्रमण ज्योतिषीय दृष्टीकोनातून फार खास मानलं जातं. मंगळ ग्रहाने (Mangal Gochar) रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. याचा सकारात्मक परिणाम 4 जुलै 2026 रोजी म्हणजेच उद्यापासून सुरु होऊन 25 जुलैपर्यंत असणार आहे. 

मंगळ ग्रहाचं रोहिणी नक्षत्रात संक्रमण हे केवळ आर्थिक दृष्टीकोनातून नाही तर वैयक्तिक जीवनावरही सकारात्मक परिणाम करणार आहे. त्यामुळे या 4 भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मंगळ ग्रहाचं रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणं मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढवणारं आहे. या कालावधीत तुम्ही जे कार्य अनेक दिवसांपासून करण्याचं टाळत होतात ते पूर्ण करण्यासाठी ही वेळ योग्य आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली दिसेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. या काळात तुमच्यातील निर्णयक्षमता दिसून येईल. जर तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. कुटुंबात सुख-शांती लाभेल. तसेच, तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. 

कन्या रास (Virgo Horoscope)

मंगळ ग्रहाचं संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी शुभवार्ता घेऊन येणार आहे. या कालावधीत तुम्ही व्यवसायाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. तसेच, तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल, समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. वैवाहिक जीवनात गोडवा वाढलेला दिसेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचं संक्रमण फार महत्त्वाचं ठरणार आहे. या काळात करिअरच्या एका नवीन उंचीवर तुम्ही असाल. तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. तसेच, तुमचे रखडलेले पैसे देखील तुम्हाला पूर्ण मिळतील. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा पहिलाच आठवडा नशीब पालटणारा; 6 पैकी 4 राशींना लागणार लॉटरी, साप्ताहिक राशीभविष्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *