Yatin Karyekar Opens Up About Divorce: मराठी सिनेसृष्टीतील (Entertainment) असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी केवळ मराठी सिनेसृष्टीत नाही तर, हिंदी इंडस्ट्रीतही (Bollywood) आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक ओळख निर्माण केली आहे. यातीलच एक दिग्गज कलाकार अभिनेते यतिन कार्येकर. यतिन यांनी केवळ चित्रपटांमध्येच नाही तर, मालिकांमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी संजय दत्त अभिनीत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या सिनेमातही काम केलं. त्यांनी या सिनेमात ‘आनंद भाई’ (Mumnnabhai MBBS) ही भूमिका साकारली होती.
अष्टपैलू यतिन कार्येकर यांनी आपल्या अभिनयातून सर्वांचेच मने जिंकली आहेत. कर्मठ ब्राह्मण असो किंवा शांततेत साकारलेली ‘आनंद भाई’ हे पात्र. त्यांनी उत्तमरित्या आपल्या भूमिकेत जीव ओतून काम केलं आहे. अलिकडेच यतिन यांनी आपल्या कारकिर्दीतील वेदनादायी काळाचा अनुभव मुलाखतीतून शेअर केला. एक काळ असा होता, जेव्हा ते प्रचंड दारुच्या आहारी गेले होते. त्यांच्याकडे स्वत:च्या उपचारासाठी पैसे नव्हते, असा खुलासा त्यांनी आपल्या मुलाखतीतून केला.
यतिन कार्येकर यांनी घटस्फोटानंतरचं आयुष्याबद्दल सांगितलं (Yatin Karyekar divorce and alcohol addiction)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यतिन यांनी लोकप्रिय मराठी अभिनेत्री इरावती हर्षे हिच्यासोबत विवाह केला होता. त्यानं 1996 साली अभिनेत्रीशी लग्नगाठ बांधली. माहितीनुसार, दोघेही आधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, त्यांचा संसार जास्त काळ टिकला नाही. त्यांच्या संसारात वादळ आलं. त्यांनी अवघ्या 5 वर्षांमध्येच विभक्त होण्याता निर्णय घेतला. त्यांनी घटस्फोट घेतला.
अभिनेत्री या नात्यातून मुव्ह ऑन झाल्या. पण यतिन यांच्यासाठी हा काळ अत्यंत वेदनादायी होता. मुलाखतीत यतिन म्हणाले, ‘घटस्फोटाच्या दीड वर्ष आधीपासून मी प्रचंड दारू पिऊ लागलो. दिवसभरात केवळ 2 तास झोपायचो. जेव्हा घटस्फोट झाला, तेव्हा मी दारु सोडण्याचा निर्णय घेतला. जर असंच सुरु राहिलं माझं लिव्हर खराब होईल असं मला जाणवलं. कारण लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठीही माझ्याकडे पैसे नव्हते’, असं यतिन म्हणाले.
‘एका छताखाली 2 अनोळखी माणसांसारखं राहण्याऐवजी वेगळं झालेलं चांगलं. मी दोन चित्रपटांच्या शुटमध्ये होतो. तर, तिला माझी कमतरता जाणवत होती. तिनं मला तेव्हा सांगितलं की तिला काम करायचं नाही. माझी त्या गोष्टीला काही हरकत नव्हती. पण उदरनिर्वाह करण्यासाठी मला काम करणं खूप गरजेचं होतं. याच काळात ती माझ्यापासून दूर झाली. याचा थेट परिणाम माझ्या करिअरवरही झाला. मी खूप एकटा पडला होतो. या काळात मला वडिलांनी साथ दिली. वडिलांच्या पाठिंब्यामुळे मी या नैराश्यातून बाहेप पडू शकलो’, असं यतिन म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
‘वेलकम टू द जंगल’चं बॉक्स ऑफिसवर वादळ; 7 व्या दिवशीही कोट्यवधींच्या घरात कमाई, किती कमावले?