Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: केतन अग्रवाल (Ketan Agrawal) याची 18 जून रोजी लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावरून (Lohagadh Case Pune) ढकलून देत हत्या केल्याप्रकरणी सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Choudhari) यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कोठडीदरम्यान काल (2 जुलै) लोणावळा पोलिसांनी सिया गोयल हिला मार्केट यार्ड परिसरातील ‘लीलाकुंज’ या घरात नेले होते. याशिवाय लुल्लानगर परिसरातील फाखरी हिल्स ‘एरिया 37’ परिसरात नेऊन पंचनामा केला. दरम्यान, पोलीस जेव्हा सियाला घेऊन तिच्या घरी आले, त्यानंतर बाहेर निघताना सियाने अश्लील हावभाव केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune)
पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनेच्या दिवशी सियाने परिधान केलेले कपडे जप्त करण्यासाठी सियाला घेऊन पुण्यातील निवासस्थानी पोहचले होते. पुण्यातील निवासस्थानातून बाहेर पडताना माध्यमांचे कॅमेरे बघताच सिया गोयलने अश्लील हावभाव केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. केतन अग्रवाल प्रकरणात अटक असलेल्या सिया गोयलचा हा मुजोरपणा आणि माज असल्याच्या टीका आता तिच्यावर करण्यात येत आहेत. व्हायरल व्हिडीओनंतर सिया गोयलवर सगळ्या स्तरातून टीका होत आहे. (Ketan Agrawal Lohagadh Case Pune)
#WATCH | Lonavala | Ketan Agarwal murder case | Police brings the accused, Siya, to her residence as the investigation into the murder of Ketan Agarwal continues pic.twitter.com/qt9OItx5vU
— ANI (@ANI) July 2, 2026
घटनेनंतर सिया ज्या ज्या ठिकाणी गेली, तिकडे पोलिसांनी केला पंचनामा- (Pune Lohagadh Crime News)
पुण्यातील तीन ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक आज सियाला पंचनामा करण्यासाठी घेऊन आले होते. 18 जून रोजी केतन अग्रवाल खून प्रकरणात अटक असलेली आरोपी सिया गोयल हिला घेऊन काल पुणे ग्रामीण पोलिसांनी घटने पूर्वी आणि घटनेनंतर सिया ज्या ज्या ठिकाणावर गेली होती तिथे पोलिसांनी पंचनामा केला आहे. यासह घटनेच्या दिवशी सियाने परिधान केलेले कपडेसुद्धा ग्रामीण पोलिसांनी जप्त केले आहेत. तसेच या आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी ज्या ठिकाणी केतनला मारण्यासाठी सराव केला होता तिथे सुद्धा भेट दिली आणि पंचनामा केला आहे.
सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी आज संपणार- (Siya Goyal Marathi News)
लोहगडावरील केतन अग्रवाल हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे आज दुपारी 2.30 वाजता दोघांनाही वडगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सियाच्या वतीने ॲडव्होकेट विपुल दुशिंग, तर चेतनच्या वतीने ॲडव्होकेट राम शहाणे न्यायालयात बाजू मांडणार आहेत. पुणे ग्रामीण पोलिस तपासासाठी आणखी वेळ मिळावा म्हणून दोन्ही आरोपींची पोलिस कोठडी वाढविण्याची मागणी करतील. तर दुसरीकडे आरोपींचे वकील न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी मागणी करण्याची शक्यता आहे. याच सुनावणीत पोलिसांकडून आरोपींच्या पॉलिग्राफ टेस्टसाठी परवानगी मागितली जाण्याची दाट शक्यता आहे.
संबंधित बातमी: