अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा पूर्व पती आणि काश्मिरी बिझनेसमन मोहसिन अख्तर मीर याने नुकतंच दुसरं लग्न केलं. उर्मिलाला घटस्फोट दिल्याच्या दोन वर्षांनंतर मोहसिनने दुसऱ्यांदा संसार थाटला आहे. निधा भट्टशी त्याने दुसऱ्यांदा निकाह केला आहे. 14 जून रोजी त्याने सोशल मीडियावर या निकाहचे फोटो पोस्ट केले होते.
लग्नानंतर मोहसिन आणि निधा हनिमूनला गेले आहेत. या दोघांनी सोशल मीडियावर हनिमूनचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये निधाने पतीच्या खांद्यावर डोकं ठेवून पोझ दिली आहे. तिच्या हातांवरील मेहंदी अजूनही पहायला मिळत आहे. या फोटोमध्ये निधाच्या हातात अंगठीसुद्धा दिसत आहे.
माझ्या चेहऱ्यावरील आनंद आणि शांतीचं कारण तू आहेस.. असं कॅप्शन मोहसिनने या फोटोंना दिलं आहे. मोहसिनने 2016 मध्ये उर्मिला मातोंडकरशी लग्न केलं होतं. लग्नाच्या आठ वर्षांनंतर त्यांनी 2024 मध्ये घटस्फोट घेतला. मोहसिन हा काश्मिरी बिझनेसमन आणि मॉडेलसुद्धा आहे.
उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन यांच्या वयात दहा वर्षांचं अंतर होतं. घटस्फोटापूर्वी बऱ्याच काळापासून या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या होत्या. मोहसिनची दुसरी पत्नी निधा ही जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर इथली आहे.
निधाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आतापर्यंत 154 पोस्ट असून तिचे 1139 जण फॉलोअर्स आहेत. तर निधा स्वत: 264 लोकांना इन्स्टावर फॉलो करते. निधाच्या बायोमध्ये उर्दूमध्ये लिहिलंय, 'देवाचे आभार, सर्व काही ठीक आहे.' यामध्ये तिने तिची राशी वृषभ असल्याचंही लिहिलं आहे. केवळ इन्स्टाग्रामच नाही तर निधाचं फेसबुक अकाऊंटसुद्धा प्रायव्हेट आहे.




