Devendra Fadnavis on Missing Link: मिसिंग लिंक इंजिनिअरिंग मार्व्हलच, महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही, देवेंद्र फडणवीस सभागृहात संतापले
Devendra Fadnavis on Missing Link: मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर काही लोकांनी सरकारवर अवाजवी टीका केली. एक कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर हे लोक पैदा झाले असतील. त्यांना खोटं बोलायला लाजही वाटत नाही. मात्र, या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून सरकारने 18 तासांत मिसिंग लिंकवरील (Connecting Link) वाहतूक पूर्ववत केली. भविष्यात मिसिंग लिंकवरुन आमच्यावर टीका करणारे शिल्लक राहणार नाहीत….