ही तर शुद्ध डिक्टेटरशिप आहे, संजय राऊत सरकारवर संतापले, नेमके प्रकरण काय ? – Marathi News | “This is sheer dictatorship”—Sanjay Raut lashes out at the government devendra fadnavis


नीट पेपर फुटी प्रकरणात दिल्लीतील जंतरमंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरु केले. त्यानंतर २१ व्या दिवशी सरकारने त्यांना रुग्णालयात उचलून नेले. त्यानंतर दिल्लीत गेले काही दिवस आंदोलन पेटले आहे. काँग्रेसने काल आणि आज संसदेच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे आंदोलन करीत सरकारला आव्हान दिले आहे. मात्र, या आंदोलनात विद्यार्थ्यांना लाठीमार करुन सरकारने हे आंदोलन मोडून काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आता या आंदोलनाला वाढता प्रतिसाद मिळत असताना सरकारने आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. याविरोधात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक पोस्ट करीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्र सोडले आहे.

नीट पेपर फुट प्रकरणात आता दिल्लीतील जंतरमंतरचे आंदोलन आता देशभर पसरले आहे. दिल्लीतील इंटरनेट सेवा काश्मीरप्रमाणे संपूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर दिल्लीतील सर्व मेट्रो सेवा बंद करण्यात आल्या आहेत.त्यामुळे आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्वीटर पोस्ट करुन जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत यांनी काय पोस्ट केली ?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक्स माध्यमावर पोस्ट टाकली आहे. त्यात ते म्हणतात मुंबई पोलिसांनी मुंबईत आंदोलन केलेल्या सुमारे १५०० विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल केली आहे. जवळपास यातील २० टक्के आरोपी हे १८ ते २० वयोगटातील आहेत. तर दर दुसऱ्या आरोपीचे वय २५ वयोगटाच्या खाली आहे. दर तिसरा आरोपी महिला आहे. १५०० मुला-मुलींवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनी नीट पेपर लिक प्रकरणात शिक्षण व्यवस्था सुधारणार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

या मुलांचा गुन्हा काय ?

या तरुण मुला मुलींचा दोष काय ?तर ते नीट परीक्षा घोटाळे मुक्त व्हावी आणि शिक्षणाचा अधिकार मिळावा, पारदर्शक कारभार असावा अशी मागणी करीत होते. आता आणखी एक धक्कादायक काय तर या दिल्लीतील जंतर-मंतरवर मुला-मुलींच्यावर आंदोलन केले म्हणून त्यांचे चेहरे ओळखून त्यांना पासपोर्ट नाकारण्यात येणार आहे. ही शुद्ध डिक्टेटरशिप आहे.

पोस्ट येथे पाहा –





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *