पासवर्ड विसरलात, नो टेन्शन, आता गुगलचे नवे फिचर, सेल्फी videoने असे लॉग-इन होणार अकाऊंट – Marathi News | Forgot password? No need to worry—Google’s new feature log in to your account using a selfie video


Selfie video for Google Account: आता सेल्फी व्हिडीओच्या मदतीने गुगल अकाऊंट तु्म्ही लॉग – इन करु शकणार आहात.त्यामुळे वारंवार पासवर्ड विसरणाऱ्या लोकांना मदत होणार आहे. जर तुमच्या अकाऊंटचा पासवर्ड इतर कोणत्याही पद्धतीने रिकव्हर होत नसेल तर आता युजर त्याचा सेल्फी व्हिडीओच्या मदतीने त्यास रिकव्हर करु शकणार आहेत. याशिवाय यास गुगलच्या अनेक इतर फिचर आणि सर्व्हीसेला एक्सेस करण्यासाठी देखील या पासवर्डचा उपयोग करता येणार आहे.

अकाऊंट रिकव्हरीचा अतिरिक्त पर्याय

गुगलने म्हटले आहे की हे फिचर पास की आणि रिकव्हरी कॉन्टॅक्टससोबत एका अतिरिक्त रिकव्हरी पर्याय म्हणून काम करणार आहे. यास सेटअप करण्यासाठी तुमच्या गुगल अकाऊंटला साईन – इन असणे गरजेचे आहे. जर साईन-इन केले नसेल तर मात्र तुम्ही सेल्फी व्हिडीओचा वापर करु शकणार नाही.

असा एड करा सेल्फी व्हिडिओ ?

मात्र, या फिचरला सध्या प्रत्येक जागी आणि प्रत्येक डिव्हाईसला रोलआऊट करण्यात आलेले नाही. यासाठी सर्वात आधी तुम्हाला एलिजिबिलिटी चेक करावी लागणार आहे. तुम्ही ब्राऊजरमध्ये g.co/signin-selfie टाइप करुन पाहू शकता,की तुमच्या डिव्हाईसला हा ऑप्शन रोलआऊट झाला आहे की नाही. जर हे फिचर तुम्हाला अव्हेलेबल असेल तर तुम्हाला फेसचा शॉर्ट व्हिडीओ घेण्याचा पर्याय दिसेल…

या फिचरला इनरोल करण्यासाठी सेल्फी व्हिडीओ सेटअप पेजला ओपन करा आणि गुगल इंस्ट्रक्शनचे पालन करा. संपूर्ण प्रोसेसच्या दरम्यान डिव्हाईसचा कॅमेऱ्यात पाहाता राहा. आणि सूचनांचे पालन करीत हेड मुव्हमेंट करत रहा. या दरम्यान कॅमेरा तुमच्या चेहरा वेगवेगळ्या अँगल कॅप्चर करेल. यानंतर तुम्ही तुमचा सेल्फी व्हिडीओ गुगल अकाऊंट सिक्युर्ड पद्धतीने सेव्ह होऊन जाईल.

केव्हा कामी येईल रेकॉर्ड केलेला व्हिडीओ?

जर तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या डिव्हाईसवरुन गुगल अकाऊंट एक्सेस करता आले नाही किंवा तुम्ही पासवर्ड आदी विसरला तर गुगल अकाऊंटच्या रिकव्हरीसाठी तुम्हाला सेल्फी व्हेरिफिकेशचा पर्याय देईल. तेव्हा तुमच्याकडून फ्रेश व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सांगितले जाईल. नंतर गुगल त्या रेकॉर्डिंगला सेव्ड व्हिडीओशी कंपेयर करेल आणि ओळख पटल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाऊंटचा एक्सेस देईल.

प्रायव्हसीची देखील काळजी

गूगलने म्हटले आहे की या व्हिडीओला युजरची सहमती नंतरच स्टोअर केले जाणार आहे. स्टोरेजच्या वेळी हा संपूर्णपणे एनक्रिप्टेड असेल आणि यास कोणत्याही समयी डिलीट करता येईल. गुगलने सांगितले स्पूफिंगला रोखण्यासाठी देखील अनेक सिक्युरिटी चेक लावण्यात आले आहेत.

येथे पोस्ट वाचा –



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *