Horoscope Today 24 July 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 24 जुलै 2026, आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस निर्मितीचा आनंद मिळेल, हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नये.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस एखादे काम आपण पैशाच्या जोरावर सहजगत्या पार पडू शकू असे वाटेल, व्यापारात प्रगती करण्यासाठी पैशाची तजवीज होऊ शकेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरामध्ये आल्हाददायक बदल कराल, नोकरीमध्ये उत्साह दाई वातावरण निर्माण होईल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिलांनी कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये, संततीच्या बाबतीत पैसा खर्च करावा लागेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रेमवीरांच्या प्रेमाला दाद मिळेल, आपल्या आयुष्यात जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य राहील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कलाकारांना आपल्या अंगातील कला दाखवण्याची संधी मिळेल, तुमच्या बौद्धिक त्याला आव्हान देणाऱ्या घटना घडतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय नोकरीमध्ये आपला फायदा करून घ्याल, तुमच्या सर्वच बाबतीत अपेक्षा वाढतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हौसेला मोल नसेल, किती पैसा खर्च झाला तरी हौस भागवून घ्याल
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चैनीच्या वस्तूंचे आकर्षण राहील, स्त्रियांच्या नवीन ओळखी होतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धांदल धावपळ यामध्ये जाईल, घरामध्ये तरुण वर्गाची येजा वाढेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरातील वातावरण उत्साही राहील, घरातील लोकांच्या नवीन कल्पनांचे स्वागत कराल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चाकोरी बाहेरील कल्पना साकारताना थोडा त्रास होईल, परंतु विचारांती मान्यता द्याल.
हेही वाचा :
Ashadhi Ekadashi 2026: भगवान विठ्ठलाच्या कानातील माश्यांचं रहस्य काय? विठुरायाला हा दागिना इतका प्रिय का आहे? धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा कमी लोकांना माहित…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)