नवी दिल्ली: संसदेवरती काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान एका महिला आंदोलकाला कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चेत (CJP Protest) आलेले दिल्ली, अंदमान आणि निकोबार बेटे पोलीस सेवेतील (DANIPS) अधिकारी ADCP संदीप लांबा यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका दिवसाच्या आत ADCP संदीप लांबा यांना त्यांच्या मूळ पोस्टिंगच्या ठिकाणी (स्टेशनवर) परत जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.(CJP Protest)
CJP Protest: नेमके काय आहे प्रकरण?
‘काँकरोच जनता पार्टी’च्या (CJP) ‘संसद चलो’ मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि आंदोलक सहभागी झाले होते. आंदोलकांना संसदेच्या दिशेने जाण्यापासून रोखण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला होता. याच दरम्यान ADCP संदीप लांबा यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये ते एकीकडे शांतपणे उभ्या असलेल्या एका महिला आंदोलकाच्या कानशिलात लगावताना स्पष्टपणे दिसून येत आहेत.
CJP Protest: सोशल मीडियावर संताप; उच्च न्यायालयातही प्रकरण पोहोचले
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला गेला. या घटनेचे पडसाद दिल्ली उच्च न्यायालयातही उमटले. बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान वरिष्ठ वकील गोपाळ शंकरनारायणन यांनी २० जुलै रोजी पोलिसांनी केलेल्या या हिंसक कारवाईचा मुद्दा उपस्थित केला.
ॲड. गोपाळ शंकरनारायणन यांनी न्यायालयाला सांगितले की, एका व्हिडीओमध्ये ADCP संदीप लांबा (ज्यांचा नेम टॅग/बॅज स्पष्ट दिसत आहे) एका बाजूला शांतपणे उभ्या असलेल्या आणि काहीही न करणाऱ्या महिला आंदोलकाला मारहाण करताना/कानशिलात लगावताना दिसत आहेत. यासोबतच, ADCP लांबा यांना थेट न्यायालयात पाचारण करण्यात यावे आणि त्यांच्या या कृत्याचा जाब विचारण्यात यावा, अशी कडक मागणी त्यांनी न्यायालयात केली.
Sonam Wangchuk On Central Goverment : सरकारने हमी दिली तर उपोषण थांबवतो- सोनम वांगचुक
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 26 वा दिवस आहे. ते गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात आहेत. तर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडण्याची सशर्त तयारी दर्शवली आहे. सरकारला पत्र लिहून त्यांनी आपल्या मागण्या सादर केल्या आहेत. तर आंदोलकांवर दंड ठोठावणार नाही अशी हमी द्या, सरकारने हमी दिली तर उपोषण थांबवतो असं वांगचुक म्हणाले. सरकारनं हमी न दिल्यास उपोषण थांबवणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई, संसदेत चर्चा करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेण्यावर विचार व्हावा, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होऊ नये, या वांगचुक यांच्या मागण्या आहेत. दिल्लीतील जंतरमंतरवर उपोषण करणाऱ्या वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्ती रुग्णालयात दाखल केलेलं.. त्यांनी आता रुग्णालयातून आपलं उपोषण सुरु ठेवलंय. नीट पेपरफुटी आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या मागण्यांसाठी ते 26 दिवस झाले उपोषण करत आहेत. त्यांनी उपोषण सोडावं अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे.(Sonam Wangchuk Health Update)
PM modi: काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया
गेल्या 34 दिवसांपासून नीट पेपर फुटीवरुन (NEET Exam Paper Leak) जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सरकारसोबत विद्यार्थ्यांची अजून तरी यशस्वी चर्चा झाली नाही. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज एक्सवर पोस्ट करत काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर भाष्य केलं आहे. (Narendra Modi on CJP Protest)
देशातील युवकांचे हित आणि त्यांचे भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पेपर लीकच्या सर्व प्रकरणांमध्ये दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यासाठी आणि खटल्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट्सची स्थापना करण्यात येईल. यासंबंधी संबंधित विभागांनी आवश्यक कारवाई सुनिश्चित करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच विद्यार्थ्यांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी सरकार घेत असलेल्या निर्णयांमध्ये हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. युवकांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला माफ केले जाणार नाही. (Narendra Modi on CJP Protest)
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया