मला सहानुभूती नकोय… तुकाराम मुंडे यांचे सततच्या बदल्यांवर मोठे भाष्य, म्हणाले.. – Marathi News | IAS officer Tukaram Munde had big condition for marriage


धडाकेबाज आणि कर्तव्य निष्ठ अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे यांची ओळख आहे. तुकाराम मुंडे कोणत्याही विभागात जावोत तिथेच आपली छाप सोडतात. तुकाराम मुंडे त्यांच्या बदल्यांमुळेही चर्चेत असतात. आतापर्यंत तब्बल 23 वेळा तुकाराम मुंडे यांच्या बदल्या झाल्या आहेत. दमदार कारवाई तुकाराम मुंडे यांनी सुरू केली की, तात्काळ त्यांची बदली केली जाते. तुकाराम मुंडे इतके शिस्तप्रिय आहेत, ते कोणालाही सहन होत नाहीत. अनेकदा लोक तुकाराम मुंडे यांच्या बदलीच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरतानाही दिसतात. अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची जबाबदारी तुकाराम मुंडे यांनी घेतल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आलेत. राज्यभरात त्यांच्या विभागाकडून जोरदार छापे टाकली जात आहेत. भेसळयुक्तांविरोधात कारवाई होत आहे. हेच नाही तर कोणाचीही गय तुकाराम मुंडे यांच्याकडून केली जात नाही.

अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात धाड सत्र सुरू आहे. मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, अकोला सर्वच ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाया होत आहेत. अनेक हॉटेल चालकांना नोटीस देण्यात आल्या तर काहींचे थेट लायसन्स रद्द केली जात आहेत. यादरम्यानच तुकाराम मुंडे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली.

या मुलाखतीमध्ये ते आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसले. तुकाराम मुंडे यांनी म्हटले की, ज्यावेळी माझे लग्न ठरत होते, त्यावेळी मी नागपूरला होतो. आमची पहिली मिटिंग झाली. त्यावेळी मी एकच अट ठेवली होती. जे काही आहे ते सांगितले होते. तू जर मोठ्या गाडीत वगैरे फिरण्याची स्वप्न बघत असशील तर शक्य नाही. जे काही आहे ते सर्व मी पुढे ठेवले होते.

तुझ्या जर वेगळ्या अपेक्षा असतील तर आपण इथेच थांबू असे मी तिला सांगितले होते. तिने माझी अट मान्य केली. मी आता तिला विचारतो की, तू माझ्यासोबत लग्न का केले? यावर तिचे उत्तर असते की, तुमची समाजाबद्दलची तळमळ बघून मी तुमच्यासोबत लग्न केले. माझ्या आयुष्यात माझ्या पत्नीची साथ महत्वाची आहे. यासोबतच तुकाराम मुंडे यादरम्यान त्यांच्या मुलांबद्दलही बोलताना दिसले.

तुकाराम मुंडे यांनी म्हटले की, माझी प्रत्येक वर्षाला बदली होते, त्यामुळे माझ्या मुलांची शाळा दरवर्षी बदलाची. त्यामुळे माझ्या मित्राचे कधी मित्रच झाले नाहीत. त्याला मित्रच वाढवता आली नाही. पण ठीक आहे. याबद्दल मला सहानुभूती नको आहे. पहिल्यांदाच आपल्या मुलांबद्दल आणि पत्नीबद्दल बोलताना तुकाराम मुंडे दिसले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *