मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
MPSC Exams CBT Pattern : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एमपीएससीच्या सर्व आगामी पूर्व परीक्षा आता ओएमआर (OMR) उत्तरपत्रिकांऐवजी संगणकाधारित म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेण्याचा ऐतिहासिक निर्णय आयोगाने घेतला आहे. परीक्षा प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय…