Kamakhya Temple Crowd Attacks Young Man and Woman: गुवाहाटीमधील (Guwahati) कामाख्या देवीच्या (Kamakhya Temple) मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कामाख्या मंदिर हे देशातील सर्वात प्राचीन आणि प्रमुख 51 शक्तीपीठांपैकी (Viral Video) एक आहे. हे मंदिर सध्या अंबुबाची यात्रेमुळे चर्चेत आहे. 22 जूनपासून अंबुबाची यात्रेला सुरुवात झाली असून, 26 जून रोजी ही यात्रा संपेल. या काळात 4 दिवस हे मंदिर भाविकांसाठी बंद राहिल. सध्या सोशल मीडियावर मंदिर परिसरातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका कपलला गर्दीतील लोकांकडून पाण्याची बॉटल फेकून (Ambubachi Mela) मारण्यात येत आहे. तसेच लोकांनी त्यांच्यावर आरडाओरडा केला आहे. यावेळी मुलगा आणि मुलगी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. नेमकं घडलं काय? जाणून घेऊयात.
कामाख्य मंदिर परिसरातील व्हायरल व्हिडीओ (Shocking Incident Near Kamakhya Temple Couple video)
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हायरल व्हिडीओ इंडिया टुडे NEने आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘कामाख्या मंदिराच्या यात्रेत जमावाने गर्दीत जोडप्यासोबत केलेले लज्जास्पद वर्तन तुम्हाला विचार करायला भाग पाडेल’. हे कपल पती पत्नी असून, तरुणीला गर्दी असल्याकारणाने श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली होती. या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, हे जोडपं प्रचंड गर्दीतून वाट काढण्याचा प्रयत्न करत आहेत. ते भीतींवरुन जाण्याचा प्रयत्न करतात.
A viral video from the ongoing Ambubachi Mela at Kamakhya Temple has triggered widespread criticism after it allegedly showed a young woman being struck by a thrown water bottle while attempting to navigate through a heavily crowded area. According to the clip, a young couple was… pic.twitter.com/fLqTkQDztR
— India Today NE (@IndiaTodayNE) June 25, 2026
तेव्हा जमावातील काही लोकांनी त्यांच्यावर बाटल्या फेकल्या. तसेच पाणी फवारले. त्यातील एक बाटली तरुणीच्या डोक्याला लागली असल्याची माहिती आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अस्वस्थ करणारा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये नाराजी व्यक्त केली. अंबुबाची यात्रेत या जोडप्यासोबत झालेलं कृत्य चुकीचं आहे, असं अनेकांनी म्हटलं आहे.
कामाख्या मंदिरातील अंबुबाची यात्रेतील व्हिडीओ व्हायरल होताच, व्हिडीओतील तरुणानं स्पष्टीकरण दिलं आहे. व्हिडीओतील तरुण हा तरुणीचा पती असून, त्यानं व्हिडीओत, ‘यात्रेत हजारो भाविकांमध्ये रांगेत उभे असताना पत्नीची अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे रांग सोडून आम्ही भींतीवर चढलो’, असं त्यानं व्हिडीओत सांगितलं. दरम्यान, गर्दीतील लोकांनी त्यांच्यावर बाटल्या फेकल्यानंतर एक बाटली तरुणीच्या डोक्याला लागली. तरुणी त्यानंतर खाली बसली, असं व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान, या गैरवर्तनाबाबत सरकार किंवा प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.दरम्यान, नेटकऱ्यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!