John Abraham Enters in Cricket: बॉलिवूड (Bollywood) आणि स्पॉर्ट्स (Sports) या दोन्ही क्षेत्रातील एकमेकांसोबतचं नातं तसं फार जुनं. बॉलिवूडमधील अनेक सिनेकलाकारांची आयपीएलमध्ये (IPL) टीम्स आहेत. शाहरुख खानची कोलकाता नाइट राइडर्स असो किंवा प्रीति झिंटाची पंजाब किंग्स. आयपीएलमध्ये अनेक कलाकारांच्या टीम्स आहेत. दबंग खान अर्थात सलमान खाननं टेनिस बॉल लीगमध्ये एक टीम विकत घेतली आहे. आता या लीस्टमध्ये अभिनेता जॉन अब्राहमचंही नाव जोडलं जात आहे. जॉन अब्राहम (John Abraham) हा रॉटरडॅम डॉकर्सचा को- ओनर बनला आहे. रॉटरडॅम डॉकर्स 26 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर 2026 (ETPL) दरम्यान आयोजित होणाऱ्या युरोपियन टी20 प्रीमियर लीगच्या (ईटीपीएल) पहिल्याच हंगामात स्पर्धा करणाऱ्या सहा फ्रँचायझी संघांपैकी एक आहे.
जॉन अब्राहम कोणत्या क्रिकेट टीमचा को-ओनर झाला? (John Abraham ETPL League)
युरोपियन क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरू पाहणाऱ्या या लीगमध्ये आपली छाप पाडण्यासाठी रॉटरडॅम डॉकर्स सज्ज होत आहे. दरम्यान, अशातच आता जॉन अब्राहम एका नामांकित मालकी आणि नेतृत्व गटामध्ये सामील झाला आहे. या गटामध्ये मॅनेजिंग पार्टनर (व्यवस्थापकीय भागीदार) मधुकर श्री यांच्यासोबत जाँटी रोड्स, फाफ डू प्लेसिस आणि हेनरिक क्लासेन या दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
ईटीपीएलमध्ये ग्लासगो, अॅमस्टरडॅम, एडिनबर्ग, डब्लिन, बेलफास्ट आणि रॉटरडॅम या 6 शहरातील संघांचा समावेश आहे. ही लीग संपूर्ण युरोपमधील क्रिकेटपटूसाठी एक नवीन आणि रोमांचक अध्याय सुरु करेल. या लीगमध्ये एकूण 32 सामने खेळले जातील. ही लीग नवीन तयार होणाऱ्या युरोपियन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठ्या दिग्गजांसोबत खेळण्यासाठी जागतीक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देईल. तसेच आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्समध्ये क्रिकेट या खेळाला प्रोत्साहन मिळेल.
ईटीपीएल जॉन अब्राहम नेमकं काय म्हणाला? (John Abrham On ETPL)
रॉटरडॅम डॉकर्समध्ये सामील झाल्यानंतर जॉन अब्राहमने यावर प्रतिक्रिया दिली आहे. जॉन अब्राहम म्हणतो, ‘क्रिकेटमध्ये प्रेरित करण्याची, एकत्र आणण्याची आणि संधी निर्माण करण्याची ताकद आहे. नेमकी हीच गोष्ट मला युरोपियन टी20 प्रीमियर लीगबाबत उत्सुक करते. युरोप हे क्रिकेटच्या वाढीसाठी अत्यंत रोमांचक बाजारपेठांपैकी एक आहे. तसेच डॉकर्सकडे दूरदृष्टी, नेतृत्व आणि महत्त्वाकांक्षा आहे. या प्रवासाचा हिस्सा होताना आणि अशा मंचमध्ये योगदान देताना मला मनापासून आनंद होतोय’, असं जॉन अब्राहम म्हणाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष