Colors Marathi Vat Pournima: कलर्स मराठी वाहिनीवरील (Colour Marathi) 2 अत्यंत लोकप्रिय मालिका ‘मी जिंकून घेईन सारं’ (Mee Jinkun Ghein Saara) आणि ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ (Mohini – Premachi Filmy Kahani) यांचे तीन दिवस सलग एका तासांचे विशेष भाग प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी घेऊन येणार आहेत. ‘वटपौर्णिमा विशेष महासंगम’ उत्सुकता वाढवणारा भाग येत्या 29 जून ते 1 जुलै तिन्ही दिवशी प्रक्षेपित केला जाणार आहे. वटपौर्णिमेच्या (Vat Pournima) या पारंपारिक आणि पवित्र सणात केवळ पूजेचा थाट नसेल, तर त्याच्या सोबतीने लपलेला सुड, छुप्या हालचाली आणि अनपेक्षित धोक्यांचे एक महावादळ घोंगावणार आहे.
वटपौर्णिमेनिमित्त कलर्स मराठीवर 2 लोकप्रिय मालिकांचा महासंगम (Colors Marathi Mahasagam of 2 Serials)
‘कलर्स मराठीची आजची सावित्री’ या संकल्पनेला अधोरेखित करत, सर्व संकटांवर मात करत आपल्या कुटुंबाची ढाल बनणाऱ्या खंबीर स्त्रियांची ही गोष्ट असून, नातेसंबंधांमधील भावनिक चढ-उतार आणि कौटुंबिक ड्रामा यांचा एक अनोखा मेळ यात पाहायला मिळणार आहे. सण सौभाग्याचा, बंध अतूट नात्यांचा वटपौर्णिमा विशेष महासंगम 29 जून ते 1 जुलै संध्या 7 वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.
हा भव्य आणि तितकाच गुंतागुंतीचा महासंगम पडद्यावर जिवंत करण्यासाठी संपूर्ण कलाकार आणि तंत्रज्ञांच्या टीमने तब्बल 3 दिवस तब्बल 40 तास शूट केले. कडक उन्हाचा, घामाचा आणि खडतर परिस्थितीचा सामना करत शूटिंग केले आहे. आऊटडोअर करत असताना कडाक्याच्या उन्हाची तमा न बाळगता, मालिकेच्या टीमने अत्यंत कष्टाने आणि कठोर परिश्रमाने हा विशेष भाग साकारला आहे. कलाकारांचा कमालीचा उत्साह आणि पडद्यामागील टीमचे अहोरात्र परिश्रम यामुळेच हा सोहळा प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण दृष्य मेजवानी ठरणार आहे.
या विशेष भागात वटपूजनाच्या शुभदिनी सुपरस्टार RK ची होणारी दमदार एन्ट्री कोणते नवे वादळ घेऊन येणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, कार्तिकी आणि शांभवी यांनी रचलेल्या निर्दयी कटात शालिनीचा जीव नेमका कसा धोक्यात सापडणार? भर कार्यक्रमातून अचानक बेपत्ता झालेल्या शालिनीच्या गायब होण्यामागे कोणते गूढ रहस्य दडले आहे? शालिनीचा शोध घेताना मोहिनीची सुरू झालेली धावपळ तिला कोणत्या संकटांचा सामना करायला लावणार आणि या शोधमोहिमेत अनिकेत आणि छवी तिच्या मदतीला कसे धावून येणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचणार आहे. विशेष म्हणजे, या कठीण प्रसंगात अनिकेत आणि छवी आपल्या जुन्या मतभेदांना बाजूला सारत मोहिनीसोबत शालिनीचा शोध घेण्यासाठी एकत्र येणार आहेत. अखेर ते शालिनीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरणार का? या सर्व रहस्यांचा उलगडा या रोमांचक भागात होणार आहे.
या रहस्याच्या सावलीतही मनोरंजनाचा आणि उत्सवाचा महाधमाका मात्र कमी होणार नाही. अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या ग्लॅमरस एन्ट्रीने संपूर्ण सोहळ्याला एक वेगळीच रंगत येणार आहे. उत्साहाच्या वातावरणात रंगणारा पारंपारिक ‘झिम्मा-फुगडी’चा खेळ आणि त्याच सोहळ्यात RK – मोहिनी आणि अनिकेत – छवीचा एक अत्यंत बहारदार, सुंदर डान्स प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही. इतकंच नव्हे तर, नात्यातील दुरावा आणि मनातलं दुःख लपवून वटसावित्रीचे व्रत करणाऱ्या छवी आणि अनिकेत तसेच RK मोहिनी यांच्यातील हळवी, रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल.
आजच्या काळातील सावित्रीचे रूप प्रेक्षकांसमोर येईल. छवी, मोहिनी आणि शालिनी यांच्या रूपाने, संकटाच्यावेळी स्त्री कशी रणरागिणी बनते, हे दाखवण्यात आले आहे. छवी आपल्या पतीच्या प्रेमासाठी आणि कुटुंबाच्या आनंदासाठी झटते आहे, तर मोहिनी आपल्या आईच्या संरक्षणासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. बाई आजींना शांभवीचे सत्य समजणार का? शालिनी नक्की कुठे गेली? काय असेल RK चा नवा डाव अशा अनेक उत्कंठावर्धक आणि मनं खिळवून ठेवणाऱ्या वळणांनी भरलेला हा महासंगम नेमकी काय नवी वळणं घेतो, हे पाहणे कमालीचे ठरेल!
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष