Gokul Gite: नाशिक विधानपरिषदेचा निकाल शिंदेंना 4 दिवस आधीच माहीत होता? आमदार गोकुळ गीतेंच्या दाव्याने खळबळ; म्हणाले, ‘महायुतीत मिठाचा खडा नको म्हणून…’


Gokul Gite:  नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीची (Mahayuti) संपूर्ण ताकद पणाला लागलेली असताना, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाने सर्वांनाच चकित केले होते. महायुतीचे सर्वाधिक लोकप्रतिनिधी नाशिकमध्ये असल्याने शिवसेनेचे (शिंदे गट) अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, गोकुळ गीते यांच्या बंडखोरीने संपूर्ण समीकरणे बदलून टाकली. आता आमदार गोकुळ गीते यांनी एबीपी माझाशी बोलताना एक खळबळजनक दावा केला आहे. नाशिकच्या विधान परिषद निकालाची एकनाथ शिंदे यांना चार दिवस आधीच कल्पना होती असा मोठा दावा त्यांनी केला आहे.

गोकुळ गीते म्हणाले की, “सोमवारी निकाल लागल्यानंतर तातडीने शिंदे साहेबांच्या भेटीसाठी मला जावे लागले. त्याच दिवशी रात्री मी मुख्यमंत्र्यांची देखील वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद देखील घेतले त्यानंतर माझा आमदार म्हणून विधिमंडळात शपथविधी देखील झाला. मतदानाच्या दिवशीच त्यांना निवडणूक आणि मतदारांचा कौल लक्षात आला होता. मधल्या चार दिवसाच्या काळात त्यांना नाशिकमधून अनेक लोकांचे फोन गेले की शिंदे साहेब आपली जागा निवडून येत नाही. समोरचा उमेदवार निवडून येत आहे. शिंदे साहेबांसारखा मोठ्या मनाचा माणूस मी पाहिला नाही. त्यांनी मोठ्या मनाने माझे स्वागत केले. पाठीवर शाब्बासकीची थाप दिली, असे त्यांनी म्हटले. 

गोकुळ गीते पुढे म्हणाले की, मतदान झाल्यानंतर मी श्रीकांत शिंदे साहेबांची गुप्त भेट घेतली होती. त्यांना विश्वास दिला होता की, साहेब ही जागा मी 100 पेक्षा जास्त मतांनी जिंकून येईल. 100 पेक्षा कमी मतांनी जिंकून आलो तर मी 6 वर्ष अपक्ष म्हणून काम करेल. पण, 100 पेक्षा जास्त मतांनी निवडून आलो तर तुम्ही मला नक्की स्वीकाराल, अशी विनंती मी केली होती. त्यांनी निकालाच्या आदल्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांना सांगितले होते की, गोकुळ मला शब्द देऊन गेला आहे की, 100 पेक्षा जास्त मतांनी निवडून येईल. त्यामुळे साहेबांना या गोष्टीचा आनंद झाला की, हा पठ्ठ्या सांगून गेला होता आणि खरंच हा जिंकून आला,” अये देखील त्यांनी म्हटले. 

Gokul Gite: महायुतीमध्ये मिठाचा खडा नको म्हणून….

या धक्कादायक खुलाशानंतर गोकुळ गीते यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. “सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नात श्रीकांत शिंदे आणि माझी भेट देखील झाली. मी जर 100 पेक्षा जास्त मतांनी जिंकलो तर माझा स्वीकार करा, असं मी श्रीकांत शिंदेंना सांगितल्याचा दावा देखील गोकुळ गीते यांनी केला आहे. महायुतीमध्ये मिठाचा खडा नको म्हणून मी शिवसेनेचा सहयोगी आमदार झालो. शिंदे सांगतील तेव्हा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे विधान देखील गोकुळ गीते यांनी केले आहे.”

आणखी वाचा 

Gokul Gite: भविष्यात पक्ष संघटनेची जबाबदारी दिली तर…; गोकुळ गीतेंचा शिंदे-सामंतांसमोरच मोठा शब्द, नेमकं काय-काय म्हणाले?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *