कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बुडून तिघांचा मृत्यू , मृतदेह बाहेर काढण्यात यश 


Kolhapur News :  कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 24 तासानंतर तिघांचेही मृतदेह सापडले आहेत. कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी शोध मोहीम राबवत तिघांचेही मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक येथे 21 वर्षीय प्रेम बागडी या तरुणाचा भोगावती नदीपात्रात पोहायला गेल्यानंतर बुडून मृत्यू झाला होता. करवीर तालुक्यातील वाकरे येथे 42 वर्षीय रमेश चौगुले याचा पाण्याचा प्रवाहातून वाहून गेल्याने बुडून मृत्यू झाला होता.  तर राधानगरी तालुक्यातील काळमावाडी कॅनॉलच्या पाण्यामध्ये सनद वराटे या 30 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू  झाला होता.  

या तिघांचेही मृतदेह बोटीच्या सहाय्याने गाळाचा वापर करुन पाण्याबाहेर काढून उत्तरे तपासणीसाठी पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत. पोलीस स्टेशनच्या परिसरात कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! खेळताना हौदात पडल्यानं दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू, नाशिकच्या बोरगावमधील घटना, गावावर शोककळा

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *