भारताली पहिली हायड्रोजन ट्रेन लॉन्च! PM मोदींनी दाखवला हिरवा झेंडा, पाहा खासियत काय | बिझनेस


Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरियाणाच्या जींद स्टेशनवरुन भारतातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. ही ट्रेन का खास आहे चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हायड्रेजन ट्रेन लॉन्च
हायड्रेजन ट्रेन लॉन्च

मुंबई : भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन रूळावर धावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरियाणातील जींद रेल्वे स्टेशनवरुन पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलाय. ही ट्रेन जींद आणि सोनीपत रेल्वे स्टेशन दरम्यान चालेल. या ट्रेनमध्ये हायट्रोजन लीक, उष्णता, आग आणि धुराचा शोध घेणाऱ्या अनेक सुरक्षा सिस्टम लावल्या आहेत. सामान्य इलेक्ट्रिक ट्रेन प्रमाणे ही ट्रेन वर लावलेल्या वीज लाइनकडून पॉवर घेत नाही. यात हायड्रोजन आणि ऑक्सीजनच्या रासायनिक प्रक्रियांनी ट्रेनच्या आत वीज तयार केली जाते. या प्रोसेसमध्ये फक्त पाण्याची वाफ आणि उष्णता निघते.

रेल्वेनुसरा, ही जुन्या काळाती वाफ आणि डिझेल इंजिनच्या ट्रेनसारखी आहे. फरक एवढाच आहे की, आता कोळसा किंवा डिझेल जाळण्याऐवजी हायड्रोजन वीज तयार केली जाते आणि यात कोणताही धूर निघत नाही. म्हणूनच याचे वर्णन रेल्वे वाहतुकीचा सर्वात स्वच्छ प्रकार म्हणून केले जात आहे.

ही ट्रेन 75 किलोमीटर प्रति तासांच्या स्पीडने चालेल. तर याची डिझाइन स्पीड ही 110 किलोमीटर प्रति तास आहे. ही ट्रेन जींद आणि सोनीपत दरम्यान 89 किलोमीटरच्या रूटवर चालेल. जगात हायड्रोजन ट्रेनचं चलन अजनही सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. जर्मनी अशी ट्रेन सुरू करणारा पहिला देश होता. तर फ्रान्स, इटली, चीन आणइ जापान सारख्या देशांमध्येही यावर काम सुरू आहे. पण तिथे अशा ट्रेनमध्ये फक्त दोन ते चार डब्बे असतात.

एकाच वेळी किती लोक प्रवास करू शकतील?

भारतातील ही ट्रेन 10 डब्ब्यांची आहे आणि यात जवळपास 2600 प्रवासी प्रवास करू शकतील. ज्यामुळे ही जगातील सर्वात मोठी हायड्रोजन ट्रेन बनते. जींदमध्ये देशातील सर्वात मोठं रेल्वे हायड्रोजन रिफ्यूलिंक प्लांटही तयार केलं आहे. येथे ट्रेनमध्ये हायड्रोजन भरण्याची पूर्ण व्यवस्था आहे. रेल्वे पुढे चालून कालका शिमलासारख्या हेरिटेज रूटवही हायड्रोजन ट्रेन चालवण्याविषयी विचार करत आहे. गेल्या 12 वर्षात वेगाने इलेक्ट्रिफिकेशन झाल्याने डिझेलवरी अवलंबित्व कमी झाले आहे आणि आता 99 टक्क्यांहून जास्त डीझेलवरील अवलंबित्व कमी झाले आहे आणि आता 99 टक्क्यांहून जास्त ब्रांड गेच रूट वीजेवरुन चालत आहेत.

मराठी बातम्या/मनी/

भारताली पहिली हायड्रोजन ट्रेन लॉन्च! PM मोदींनी दाखवला हिरवा झेंडा, पाहा खासियत काय



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *