Akshay Waghmare wife yogita gawali becomes advocate Shares post: शिक्षणाला कोणतीही वयोमर्यादा नसते, याचा प्रत्यय नुकतंच अरुण गवळी यांची लेक योगिता गवळी हिच्याकडून आला आहे. योगिता गवळी हिनं आपल्या घराची मान उंचावणारी गोष्ट केली आहे. योगिता गवळीनं वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ती निवडणुकीच्या रिंगणातही उतरली होती. पण तिला राजकारणात फारसं यश मिळालेले नाही. संसार आणि राजकारण या गोष्टी सांभाळून ती स्वत:चा अभ्यास सांभाळत होती. आज तिने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे. योगिताचे कौतुक करत, तिचा नवरा आणि अभिनेता अक्षय वाघमारे याने त्याच्या बायकोविषयी एक खास पोस्ट शेअर केली आहे. अक्षयची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
योगित गवळी अॅडव्होकेट झाली (Arun Gawlis Daughter Yogita Becomes an Advocate)
अरुण गवळी यांची लेक योगिता गवळी हिनं राजकीय मैदानात उडी घेतली होती. माहितीनुसार, तिनं भायखळा मतदारसंघातून महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. दरम्यान, तिनं नुकतंच वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे. अभिनेता अक्षयने आपल्या पत्नीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. अक्षयने योगिताचे काही फोटो सोशल मीडियात शेअर केले आहे. फोटो शेअर करत त्यानं लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे. त्यानं कॅप्शनमध्ये नक्की काय लिहिलं? जाणून घेऊयात.
त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘अॅडव्होकेट योगिता आशा अरुण गवळी. हे खरं आहे, कष्टाचे फळ हे नेहमी मिळते. दिवस रात्र तू मेहनत घेतली. त्या कष्टाचे फळ तुला मिळाले आहे. शेवटी तू अॅडव्होकेट झाली आहेस. तू करुन दाखवलं, याचा अभिमान आहे. तू तुझ्या आई – वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहेस. कुटुंब, पॉलिटिक्स, प्रेग्नेंसी तसेच आयुष्यात सुरु असलेल्या अनेक गोष्टींवर मात करत आज तू वकील झाली आहेस. खरंच तुझा मला अभिमान आहे’, असं अक्षयने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘आपल्या छोटीला झोपवून तू कित्येत रात्र जागून अभ्यास पूर्ण केला आहेस. यावरुन मला खरंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण झाली. हे सगळं मी स्वत:हून जवळून पाहिलं आहे. मी स्वत: पास झालो तेव्हा मला इतका आनंद झाला नव्हता, जितका आनंद आज झाला आहे मला. एक उच्चशिक्षित पदवीधर.. अॅडव्होकेट. योगिता आशा अरुण गवळी’, असं म्हणत अक्षयने योगिताचे कौतुक केले आहे. अक्षयची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली असून, या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करुन योगिताचे कौतुक केले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: