Weekly Horoscope 13 To 19 July 2026: जुलै महिना हा अत्यंत खास आहे, ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर, जुलैचा नवा आठवडा 13 ते 19 जुलै 2026 हा अनेकांचे नशीब पालटणारा ठरणार आहे, या आठवड्यात सोमवती अमावस्या येतेय, तसेच ग्रहांचे शुभ योग होत आहेत, त्यामुळे हा आठवडा अत्यंत खास आहे, सोबत ग्रहांच्या विविध राजयोगामुळे काही राशींना लाभदायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.. तर काहींना संयम, नियोजन आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. विशेषतः जुलै महिन्याचा नवा आठवडा (Weekly Horoscope) मेष ते मीन अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीसाठी 6 ते 12 जुलै या आठवड्यात कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या अनावश्यक खर्च टाळा. प्रेमसंबंधांमध्ये संवाद वाढवल्यास गैरसमज दूर होतील. आरोग्यासाठी पुरेशी झोप आणि संतुलित आहार आवश्यक आहे.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीसाठी या आठवड्यात नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती सुधारेल आणि नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रवासाचा योग संभवतो.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात संयम ठेवणे महत्त्वाचे ठरेल. कोणताही मोठा आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. कार्यालयात सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. आरोग्याबाबत निष्काळजीपणा टाळा.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीसाठी हा आठवडा करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसायात नवीन करार लाभदायक ठरतील. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नात्यात गोडवा वाढेल. आर्थिक नियोजन यशस्वी होईल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानाचा आधार घ्या.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीसाठी या आठवड्यात आठवड्याच्या सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात, पण शेवटी परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. नोकरीत पदोन्नती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य सामान्य राहील.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामात मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. आर्थिक लाभाची शक्यता असून जुनी देणी वसूल होऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंद राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आठवडा अनुकूल आहे. व्यवसायात नफा वाढेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. मित्रांच्या मदतीने महत्त्वाचे काम पूर्ण होईल. आरोग्य चांगले राहील.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीसाठी या आठवड्यात भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत बदलाचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक लाभासोबत खर्चही वाढू शकतो. कुटुंबातील वडिलधाऱ्यांचा सल्ला फायदेशीर ठरेल.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्याची उत्तम साथ मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायात विस्ताराची संधी मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल दिसतील. प्रवास लाभदायक ठरेल.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढेल, पण तुमची कामगिरी प्रभावी राहील. आर्थिकदृष्ट्या आठवडा चांगला आहे. घरात शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित व्यायाम करा.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात नवीन योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. आर्थिक लाभ होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये अपेक्षित प्रगती होईल. व्यवसायात नवीन ग्राहक मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्य उत्तम राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
Vish Yog 2026: शनिचा ‘विष योग’ बनला, 3 राशींच्या आयुष्यात खळबळ माजवणार, अशुभ योगामुळे पैसा, नोकरी, प्रेमात मोठे बदल…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)