Donald Trump America Iran War नवी दिल्ली: अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तीन तेलवाहतूक करणाऱ्या जहाजांवर हल्ले झाल्यानंतर अमेरिकेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेच्या हवाई दलानं इराणच्या 80 ठिकाणांवर हल्ले केले. इराणवर हल्ले केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता शांतता करार संपला आहे. इराणसोबत चर्चा होणार नाही, असं म्हटलं. आज रात्री इराणवर विध्वसंक हल्ला केला जाऊ शकतो, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. यानंतर इराणनं देखील अमेरिका आणि आखाती देशांना विनाशकारी परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. यामुळं ट्रम्प यांच्या धमकीनुसार अमेरिका इराणवर हल्ले करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
इराणला शिक्षा देणार : डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेच्या लष्करी कारवाईला नाटोनं देखील समर्थन दिलं आहे. इराणच्या सैन्यानं अली खामेनी यांच्या अंत्य संस्काराच्या कालावधीत होर्मुझच्या सामुद्रधुनीत तीन जहाजांवर हल्ले केल्याचा दावा करण्यात येत आहे. कतार, सौदी अरेबियाच्या तेल वाहतूक जहाजांवर हल्ले करण्यात आले होते. इराणच्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं हल्ले केले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिल्यानंतर इराणच्या सैन्य ठिकाणांवर आणि तेल साठ्यांवर हल्ले होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अंकारमध्ये सुरु असलेल्या नाटो समिटमध्ये पोहोचण्यासाठी ट्रम्प यांनी इराणवर हल्लाबोल केला आहे. इराणवर खोटं बोलणे आणि करार तोडण्याचा आरोप केला आहे.
ट्रम्प यांनी आम्ही काल त्यांच्यावर (इराणवर) जोरदार हल्ला केल्याचं म्हटलं. आज रात्री पुन्हा हल्ले करु असंही ट्रम्प म्हणाले. इराण आखाती देशांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आता असं राहणार नाही. आम्ही धोकादायक लोकांवर हल्ले केले आहे. ते प्रत्येक वेळी हल्ले करतील, आम्ही उत्तरं देणार आहे. आज रात्री मी त्यांना पुन्हा शिक्षा देऊ शकतो, मी त्यांना थोडा इशारा देतोय, असं ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की इराणनं काही जहाजांवर हल्ले केले आहेत, आम्ही त्यांच्यावर त्यापेक्षा मोठे हल्ले केले. जे काही होईल ते लवकर संपेल. यामुळं तेलाची स्थिती अधिक सुरक्षित होईल. ट्रम्प यांनी म्हटलं की इराणच्या निशाण्यावर ते आहेत. इराणच्या किल लिस्टमध्ये माझं नाव पहिलं आहे, असंही ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा शांतता करार संपला आहे. इराणवर मोठा हल्ला करणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटल्यानं पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?