IND vs ENG: जर शक्य असेल तर… जोफ्रा आर्चरचं वैभव सूर्यवंशीला ऑपन चॅलेंज; सलग दोन विजयानंतर काय बोलला? – Marathi News | Jofra archer statement on vaibhav sooryavanshi ahead of india vs england 4th t20


15 वर्षीय भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांच्यात मैदानावर एक रोमांचक लढत सुरू आहे. आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळणारे हे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकमेकांना जोरदार आव्हान देत आहेत. वैभवने सलग दुसऱ्या सामन्यात आर्चरच्या गोलंदाजीवर षटकार मारला, पण इंग्लिश गोलंदाजाने ताशी 145 किमी वेगाने टाकलेल्या एका शॉर्ट बॉलवर त्याला बाद करून हिशोब चुकता केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून वैभव सूर्यवंशीने निर्भय फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. आता पुन्हा एकदा चौथ्या सामन्यापूर्वी जोफ्रा आर्चरने वैभवला एक चॅलेंज दिले आहे.

मँचेस्टर येथे झालेल्या आपल्या पदार्पणाच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात वैभवने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला षटकार ठोकला होता. मात्र, 10 चेंडूंमध्ये 14 धावा करून तो बाद झाला. ट्रेंट ब्रिज येथे झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यातही वैभवने तोच आक्रमक दृष्टिकोन दाखवला. 202 धावांचे लक्ष्य गाठताना त्याने आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर एक शानदार षटकार ठोकला. त्यानंतर त्याने जोश टंगच्या गोलंदाजीवर एक मोठा षटकार मारून आपला इरादा स्पष्ट केला.

वैभवची आक्रमक फलंदाजी फार काळ टिकली नाही. जोफ्रा आर्चरने 145 किमी प्रतितास वेगाने एक शॉर्ट-पिच चेंडू टाकला. हुक शॉट मारण्याच्या प्रयत्नात चेंडू त्याच्या ग्लोव्हजला लागून यष्टीरक्षक जोस बटलरच्या हातात गेला. सलग दुसऱ्या षटकारांच्या विजयानंतर आर्चरने एक बळी घेतला. या सामन्यात आर्चरने वैभव सूर्यवंशीसोबत श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलचे बळी घेतले. 3/29 या कामगिरीबद्दल त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभात वैभवसोबतच्या स्पर्धेबद्दल विचारले असता, आर्चर हसून म्हणाला की, “सामना आता बरोबरीत आला आहे. मालिकेत अजून दोन सामने बाकी आहेत आणि ज्याच्याकडून चांगली कामगिरी होण्याची शक्यात आहे तोच संघ जिंकेल.” पुढे म्हणाला,” तुम्ही एका चांगल्या लेथवर बॉल सरळ फेकण्याचा प्रयत्न करता. कारण विकेट खूप सोप्पे आहेत, बाऊंड्री छोट्या आहेत. तुम्हाला वास्तविकरित्या खुप खास व्हावे लागते. इकडे तुमच्या जास्त चुका घडू शकण्याची शक्यता आहे.”

प्रथम फलंदाजी करताना, फिल सॉल्टच्या 70 आणि सॅम करनच्या नाबाद 41 धावांच्या जोरावर इंग्लंडने 20 षटकांत 7 गडी गमावून 201 धावा केल्या. प्रत्युत्तरात, 202 धावांचे लक्ष्य गाठताना भारताचा संघ केवळ 76 धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने तीन आणि जोश टंगने चार बळी घेतले. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या टी20  मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *