Last Updated:
Shocking Incident : बदलापूरमध्ये नदीकाठी अचानक गोंधळ उडाला. काही क्षणांतच परिसरात मोठी धावपळ सुरू झाली आणि लोकांच्या आरडाओरडामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. नेमकं काय घडलं, याची चर्चा मात्र बराच वेळ सुरू होती.
बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथं मुसळधार पावसामुळे दुथडी भरुन वाहत असलेल्या उल्हास नदीच्या पाण्याचा वेग पाहण्यासाठी आली होती. पण कोणालाही काही समजण्याच्या आतच तिथे असं काही घडलं, ज्याने रस्त्यावरुन जाणारी वाहन अचानक थांबतात आणि नागरिकांची गर्दी जमताच आरडाओरड सुरु होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापुरातही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे तेथील उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीतही मोठी वाढ झाली असून नदीचे रौद्ररुप पाहण्यासाठी मिळत आहे. हेच वाहते पाणी आणि पूरसदृश्य परिस्थिती पाहण्यासाठी नदीकाठी हे महिला तिथं आली होती. पण पुलावर उभी असतानाच तिने कोणालाही कळण्याच्या आतच कठडा ओलांडला आणि थेट नदीच्या वेगवान प्रवाहात थेट उडी मारली.
या घडलेल्या प्रकारानंतर तिथं असलेल्या लोकांना काही समजायच्या आणि तिला वाचवायच्या ती वाहत्या पाण्यात गायब झाली. या धक्कादायक घटनेची माहिती घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रेणेला देताचे ते घटनास्थळी दाखल झाले. सध्याच्या स्थितील या पथकाकडून नदीपात्रात उडी मारलेल्या महिलेचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आलेले आहे. पण सध्या मुसळधार पाऊस आणि नदीला आलेल्या पूरामुळे शिवाय पाण्याचा प्रचंड असलेला वेग या गोष्टीमुळे शोधमोहीम राबवण्यात प्रशासनाला मोठ्या अडचणी येत आहेत.
उल्हास नदीत अचानक उडी मारणाऱ्या महिला नेमकी कोण होती, कुठे राहत होती आणि तिने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, या मागील कारण अजूनही समजू शकलेले नाही. तिने आत्महत्येचा प्रयत्न का केली किंवा या मागे काही दुसरे कारण काय होते याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.
Mumbai,Maharashtra
बदलापूर हादरलं! नदीचं रौद्ररूप पाहायला आली अन् काही वेळातच तिने घेतला तो निर्णय; रस्त्यावर सुरु झाली आरडाओरड
