Sairat Fame Actor Arbaz Shaikh: नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘सैराट’नं (Sairat Marathi Movie) सिनेसृष्टीत इतिहास घडवला. फक्त महाराष्ट्रातच नाहीतर आपला डंका सातासमुद्रापार पोहोचवला. या सिनेमातल्या प्रत्येक पात्राला विशेष ओळख मिळाली. सिनेमात रिंकू राजगुरू (Rinku Rajguru), आकाश ठोसर (Akash Thosar), तानाजी गळगुंडे (Tanaji Galgunde) यांसारख्या कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. याच्यात आणखी एकजण होता, ज्यानं आपल्या दमदार अभिनयानं सर्वांना दखल घ्यायला भाग पाडलेलं. तो म्हणजे, अरबाज शेख (Arbaz Shaikh). अरबाज शेख यानं ‘सैराट’ (Sairat) या सिनेमात ‘सल्या’ची भूमिका साकारली होती. या भूमिकेनंतर त्याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. सध्या याच अरबाज शेखचा एक व्हिडीओ (Arbaz Shaikh Video) सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अरबाज काहीसा भावूक झाला असून त्यानं आर्थिक मदतीचं आवाहनही त्याच्या चाहत्यांना केलंय.
‘सैराट’ सिनेमाच्या माध्यमातून परिचयाला आलेला सल्या… म्हणजेच, अरबाज शेख यानं एक विडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. ज्यात तो काहीसा भावूक होऊन रडताना दिसतोय. अरबाज शेखच्या वडिलांवर सध्या सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण, या रुग्णालयात कशा पद्धतीनं लूट होतेय हे अरबाज शेख यानं आपल्या व्हिडीओत सांगितलंय. हॉस्पिटलमधील मेडिकलमधून औषधं घेणं बंधनकारक नसताना ही हॉस्पिटल एकाच मेडिकलमधून औषधं घेण्यासाठी जबरदस्ती करतं असल्याचं त्यानं या व्हिडीओत सांगितलंय. आपल्या डोळ्यांपुढे आपल्या वडिलांना मरताना बघायचं नाही, असं म्हणत अरबाज शेख यानं रडत रडत भावनिक आवाहन केलंय. वडिलांचा उपचारासाठी खर्च भगवण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन देखील त्यानं केलंय.
अरबाज शेखला आलाय रुग्णालयाचा धक्कादायक अनुभव, काय म्हणाला? (Arbaz Shaikh Appeal For Financial Help)
अरबाज शेख व्हिडीओमध्ये म्हणालाय की, “नमस्कार मी अरबाज शेख, मी आता सोलापुरातील नोबल हॉस्पिटलसमोर उभा आहे. आठ दिवस झाले, पप्पांना ब्रेन हॅमरेज झालंय म्हणून सोलापूरला अॅडमिट केलंय. त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला नोबल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेलं. नोबल हॉस्पिटलचा अनुभव मला इतका घाण आला की, जेव्हा आम्ही पेशंटला तिथे अॅडमिट केलं, तेव्हा सर्वात 10 हजार रुपये डिपॉझिट भरायला सांगितलं, आम्ही ते भरले… त्यानंतर त्यांनी मला गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की, या गोळ्या आपल्याला लागतील. मग मी त्यांना विचारलं की, मी हे बाहेरुन आणू शकतो? तर त्यांनी सांगितलं की, नाही तुम्हाला आमच्या मेडिकलमधूनच त्या गोळ्या, इंजेक्शन्स घ्यावा लागतील. मी त्यांच्या मेडिकलमधून औषधं घेतली, तर ती सर्व औषधं 40 हजारांहून जास्त किमतीची होती. त्यांच्याच मेडिकलमधून औषधं घ्यावीत, हा फोर्स होता. यापूर्वी जेव्हा पप्पांना अॅडमिट केलं, तेव्हा तिथे मला असा काहीच अनुभव आला नाही. त्या गोळ्या मी बाहेरुन आणल्या की, जवळपास अर्ध्या किमतीत मला त्या पडत होत्या. पण इथे एवढी लूट होतीय, माझ्या बापाला मला मरताना नाही पाहायचंय, म्हणून मला त्यांना नोबलमधून शिफ्ट करावं लागलं. मला खूपच इथे वाईट अनुभव आलाय, त्यामुळे ज्यांना माहीत आहे त्यांनी मला सांगावं की, मी कुठे ट्रिटमेंट केली पाहिजे? कशी ट्रिटमेंट केली पाहिजे मला आता काहीच कळत नाहीये, माझ्या वडिलांना मला वाचवायचंय काही करुन, मला मदत करा प्लीज…”, असं म्हणताना अरबाजच्या अश्रुंचा बांध फुटला आहे.
व्हिडीओ शेअर करत अरबाज शेखनं कॅप्शनमध्येही मदत करण्याचं आवाहन केलंय. अरबाज शेखनं म्हटलंय की, “आत्ता मी खूप आर्थिक अडचणीत आहे… पण तरीही माझ्या वडिलांचा treatment सुरू ठेवणं खूप गरजेचं आहे. Google pay no – 8888515473 तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, ज्यांना शक्य असेल त्यांनी थोडीशी आर्थिक मदत करावी किंवा हा post जास्तीत जास्त share करावा. तुमची छोटी मदत माझ्यासाठी खूप मोठी ठरेल…”
महत्त्वाच्या इतर बातम्या :