Pune Rain Alert: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह, पुणे, रायगड, तळकोकणात पावसाने (Pune Rain Alert) धुमाकूळ घातला आहे. तर पुणे शहर (Pune Rain Alert) परिसरात कालपासून (गुरुवारी, ता २) रात्रीपासून संततधार सुरु आहे. आज (शुक्रवारी) सकाळीही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढला असून पुणेकरांना (Pune Rain Alert) पाणीटंचाईपासून तूर्तास दिलासा मिळाला आहे. दरम्यान पुण्यात पावासाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने पुण्याच्या घाटमाथ्यावर पुढील ३ दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर ७ जुलै पर्यंत हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.(Pune Rain Alert)
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुढील दोन ते तीन दिवस शहरात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. विशेषतः घाटविभागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असल्याने घाटविभागाला पुढील तीन दिवसांसाठी ‘रेड’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारी (ता. २) शहरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या पावसामुळे अनेक सखल भागांत आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे चित्र होते. परिणामी, कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली. शहरातील अनेक भागांत वाहतूक व्यवस्था संथगतीने सुरू होती. (Pune Rain Alert)
Pune Rain Alert : लोणावळ्यात तुफान पाऊस, पांघरली धुक्याची चादर!
मुसळधार पावसामुळे लोणावळा सध्या दाट धुक्याच्या चादरीत हरवून गेलाय. घाटमाथ्यावरील डोंगररांगा, दऱ्या आणि रस्ते धुक्यात लपल्याचं नयनरम्य दृश्य इथं पाहायला मिळतय. पावसाने कृपादृष्टी दाखवताचं लोणावळ्याचं रूप आणखी खुललंय. आता या मोहक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक तरी मागे कसे काय राहतील. त्यांची पावलंही लोणावळ्याकडे वळू लागली आहेत. निसर्गाने उधळलेल्या या धुक्याच्या देखण्या सोहळ्याने लोणावळा जणू ढगांच्या कुशीत विसावल्याचा अनुभव पर्यटक घेत आहेत.
Pune News : लोणावळ्याच्या निसर्गात हुल्लडबाज पर्यटकांचा जीवाशी खेळ!
लोणावळ्यात पावसाने जोरदार हजेरी लावताच निसर्ग बहरून आला आहे. धुक्यात हरवलेला सह्याद्री, त्यातून फेसाळत कोसळणारे धबधबे आणि हिरवाईने नटलेला परिसर पर्यटकांना खुणावत आहे. मात्र या मनमोहक निसर्गात काही हुल्लडबाज पर्यटक स्वतःच्याच जीवाशी खेळ करत असल्याचं चित्र समोर आलं आहे. सहारा ब्रिज परिसरातील धबधब्यावर अनेक पर्यटक धोकादायक कड्यांवर चढून सेल्फी आणि रील्सच्या नादात सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवत आहेत. सततच्या पावसामुळे खडक आणि पायवाटा निसरड्या झाल्या असून, एका चुकीच्या पावलाची किंमत जीव गमावून मोजावी लागू शकते. तरीही अनेकजण कोणतीही काळजी न घेता धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत. लोणावळा पोलिसांकडून वारंवार सुरक्षिततेचं आवाहन केलं जात असलं, तरी त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे. विकेंड सुरू होण्यापूर्वीच लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून, अशा बेफिकीर पर्यटनामुळे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच पर्यटकांनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. पोलिसांनी पर्यटकांना पहिला इशारा दिलाय, पुढं मात्र कारवाईचा बडगा उगरण्यात येणार आहे.
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग