Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?


Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: मुंबईतील (Mumbai News) सुसंस्कृत परिसर असलेल्या गिरगाव (Girgaon) छुप्या पद्धतीनं सुरू असलेल्या एका हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा (High-Profile Sex Racket) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोठा शिताफिनं पर्दाफाश केलाय. हे प्रकरण समोर आल्यानंतर स्वप्नांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या झगमगाटामागचं गडद काळ्याकुट्ट अंधारानं व्यापलेलं जग समोर आलं आणि खळबळ माजली. या घटनेत आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, मुंबई पोलिसांनी या सेक्स रॅकेटमधून (Sex Racket) दोन अभिनेत्रींची सुटका केलीय. त्यापैकी एक मराठीतली आघाडीची अभिनेत्री (Marathi Actress) असून दुसरी बॉलिवूडमध्ये (Bollywood News) छोट्या-मोठ्या भूमिका साकारणारी अभिनेत्री असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, मुंबई पोलिसांनी सुटका करण्यात आलेल्या महिलेची ओळख उघड केलेली नाही. 

मुंबई पोलिसांनी गिरगाव परिसरात एका हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आणि संपूर्ण शहरात खळबळ माजली. हे संपूर्ण रॅकेट एका आलिशान हॉटेलमधून चालवलं जात होतं. विशेष म्हणजे, या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन अभिनेत्रींची सुटका केलीय आणि एका एजंटला घटनास्थळीच रंगेहाथ अटक केलीय. मुंबई गुन्हे शाखेच्या ‘मानवी तस्करी विरोधी कक्षा’नं (Anti-Human Trafficking Cell) ही कारवाई केली. हे रॅकेट बऱ्याच काळापासून कार्यरत असल्याची माहिती समोर येतेय. मुंबई पोलिसांनी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर आणि आवश्यक ती तयारी पूर्ण केल्यानंतर छापा टाकला. या रॅकेटमध्ये अनेक बड्या व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जातेय.

मराठी आणि बॉलिवूडच्या 2 अभिनेत्रींची सुटका (Marathi Actress Lured Into Trap With Promise Of Money)

मुंबई पोलिसांनी दोन अभिनेत्रींची या हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटमधून सुटका केलीय. या दोन्ही अभिनेत्री सिनेसृष्टीत कार्यरत असून त्यांनी अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सुटका करण्यात आलेल्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे, जिनं अनेक सिनेमांत मुख्य भूमिका केल्यात, तर दुसरी अभिनेत्री बंगाली आणि हिंदी सिनेमांमध्ये छोट्या आणि ‘कॅमिओ’ भूमिकांमध्ये झळकलीय. हे रॅकेट चालवताना रंगेहाथ पकडलेला एजंट प्रत्यक्षात एक ‘मेकअप आर्टिस्ट’ आहे, जो विविध सेलिब्रिटींसोबत काम करतो. त्यानंच या अभिनेत्रींना या रॅकेटमध्ये ओढलेलं, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आलीय. पोलिसांनी आरोपी मेकअप आर्टिस्टला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. 

मुंबई पोलिसांनी कसा केला हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेट पर्दाफाश? (Mumbai Police Bust High-Profile Sex Racket)

मुंबई पोलिसांना गिरगावातील सेक्स रॅकेटबाबत माहिती मिळालेली. या बेकायदेशीर कृत्यांची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी सर्वात आधी हॉटेलमध्ये एक बनावट ग्राहक पाठवला. व्यवहार निश्चित होऊन पोलिसांना तसा संदेश मिळताच, पथकानं त्वरित छापा टाकला आणि त्या महिलांची सुटका केली. पोलिसांच्या माहितीनुसार, या महिलांना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं होतं आणि त्यांच्या सेवांसाठी ग्राहकांकडून अवाढव्य रक्कम उकळली जात होती. सुरक्षितता आणि गोपनीयतेचा विचार करून, मुंबई पोलिसांनी सुटका करण्यात आलेल्या दोन्ही अभिनेत्रींची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवलीय.

मोठी नावं समोर येण्याची शक्यता (Girgaon High Profile Prostitution Racket)

मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आता या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आणि कसून तपास करतेय. पोलीस आर्थिक व्यवहारांच्या नोंदींची बारकाईनं तपासणी करत आहेत. त्याचबरोबर, या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींची कसून चौकशी केली जातेय, हॉटेल व्यवस्थापनाचा यात काही सहभाग आहे का? याचाही तपास सुरू आहे. हे एक ‘हाय-प्रोफाईल’ रॅकेट मानलं जात असून त्यात बड्या व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आगामी काळात आणखी काही महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *