Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा पहिलाच आठवडा नशीब पालटणारा; 6 पैकी 4 राशींना लागणार लॉटरी, साप्ताहिक राशीभविष्य


Weekly Horoscope 6 To 12 July 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, जुलै (July 2026) महिन्याला सुरुवात झाली आहे. लवकरच जुलैचा पहिला आठवडा सुरु होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 6 ते 12 जुलै 2026 असा हा कालावधी असणार आहे. दरम्यान नवीन महिन्याचा पहिलाच आठवडा आपल्यासाठी नेमका कसा असेल? करिअर, आरोग्य, नोकरी आणि लव्ह लाईफ कशी असेल? याबाबत प्रत्येकाला उत्सुकता असते. यासाठी आपण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्याचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सावधानतेचा असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कामकाजात नीट लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच, नोकरी आणि व्यवसायात तुम्ही केलेल्या मेहनतीचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल. या आठवड्यात तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. यामुळे अनेकजण दुखावण्याची शक्यता आहे. तसेच, काही महत्त्वाचे निर्णयही तुम्ही याच कालावधीत घ्याल. 

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीसाठी 6 ते 12 जुलै 2026 चा कालावधी शुभ संकेत देणारा असणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. काही सकारात्मक बदल घडलेले दिसतील. काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. तसेच, करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. 

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी जुलैचा पहिला आठवडा आत्मविश्वास वाढवणारा असणार आहे. या काळात कोणताही अहंकार मनात बाळगू नका. तसेच, वाईट मित्रांच्या संगतीत राहू नका. करिअरच्या बाबतीत घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा विचार घ्या. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक तंगी जाणवू शकते. अशा वेळी पैशांचा जपून वापर करा. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीसाठी नवीन आठवड्याची सुरुवात शुभकारक असणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. तसेच, या कालावधीत समाजातील काही प्रभावशाली व्यक्तींशी तुमच्या गाठीभेटी होतील. काही नवीन संपर्क निर्माण होतील. महत्त्वाच्या कामांना आधी प्रोत्साहन द्या. आरोग्याची काळजी घ्या. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या कालावधीत तुमच्या व्यवसायाच्या बाबतीत कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहा. तसेच, वाहन चालवताना काळजी घ्या. कामाच्या वाढत्या तणावामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी 6 ते 12 जुलैचा कालावधी शुभ संकेत देणारा असणार आहे. तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, या काळात कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी कामे वेळेत पूर्ण होतील. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 3 July 2026 : आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 7 राशींवर असणार गणरायाची कृपा; संध्याकाळपर्यंत मिळणार शुभ संकेत, वाचा आजचे राशीभविष्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *