OTT Web Series: अवघे 6 एपिसोड, पण थरार जबरदस्त! सायबर क्राइम सस्पेन्सने प्रेक्षकांना वेड लावणारी ही वेब सीरिज OTT वर नंबर-1


OTT Web Series: ओटीटीवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. त्यापैकी काही वेब सीरिजची घोषणा आधीच झालेली असल्याने प्रेक्षक त्यांची आतुरतेने वाट पाहत असतात.अलीकडेच प्रदर्शित झालेल्या अशाच एका वेब सीरिजने अवघ्या 6 भागांच्या दमदार कथेमुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. रिलीज होताच या सीरिजने मोठी लोकप्रियता मिळवली असून सध्या ती ओटीटीवर नंबर-1 वर ट्रेंड करत आहे. जाणून घेऊया कोणती आहे ही वेब सीरिज. (webseries)

OTT वर या नव्या सीरिजची जोरदार चर्चा

या वेब सीरिजचा प्रीमियर 3 जुलै रोजी ओटीटीवर झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील एका दिग्गज दिग्दर्शकाने या सीरिजचे दिग्दर्शन केले असून, त्याचबरोबर त्यांनी आपल्या मुलालाही या सीरिजमधून प्रमुख भूमिकेत लॉन्च केले आहे. येथे आपण ‘प्रीतम अँड पेड्रो’ (Pritam And Pedro) या वेब सीरिजबद्दल बोलत आहोत.ही सीरिज जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) वर प्रदर्शित झाली असून, रिलीज होताच तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. वेगळ्या कथानकामुळे आणि रंजक सादरीकरणामुळे या सीरिजची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

सायबर क्राइम, सस्पेन्स आणि कॉमेडीचा भन्नाट संगम

‘प्रीतम अँड पेड्रो’ या 6 भागांच्या वेब सीरिजमध्ये सायबर क्राइम, सस्पेन्स आणि कॉमेडी यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो.कथेत एका क्राइम ब्रँच अधिकाऱ्याची आणि हॅकरची जोडी एका अनपेक्षित संकटात अडकते. त्यानंतर ते त्या संकटातून कसे बाहेर पडतात, याचा थरारक प्रवास या सीरिजमध्ये पाहायला मिळतो. शेवटपर्यंत उत्कंठा कायम ठेवणारी ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

जिओ हॉटस्टारवर नंबर-1 वर ट्रेंड

वेगळ्या सायबर क्राइम कथानकामुळे ‘प्रीतम अँड पेड्रो’ला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. याच कारणामुळे ही वेब सीरिज सध्या जिओ हॉटस्टारवर नंबर-1 वर ट्रेंड करत आहे.या सीरिजमध्ये अरशद वारसी, वीर हिरानी आणि विक्रांत मॅसी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या असून त्यांच्या अभिनयाचेही प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *