IND vs ENG 4th T20 Playing 11 : इंग्लंडविरुद्धचा आजचा चौथा टी-20 सामना भारतीय क्रिकेट संघासाठी करो या मरो असा असणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता ही मालिका जिंकू शकत नाही, परंतु उर्वरित दोन्ही सामने जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी भारताकडे नक्कीच आहे. टी-20 वर्ल्ड कपचा प्लेयर ऑफ द टूर्नामेंट राहिलेल्या संजू सॅमसनला पहिल्या सामन्यानंतर संघातून वगळण्यात आले होते आणि त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीला संधी दिली गेली. मात्र, यामुळे संघाची स्थिती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडली. गेल्या सामन्यात तर इंग्लंडच्या 200 हून अधिक धावांचा पाठलाग करताना संपूर्ण भारतीय संघ अवघ्या 76 धावांवर गारद झाला होता. त्यातच सतत फ्लॉप ठरत असलेला उपकर्णधार तिलक वर्मा सध्या चाहत्यांच्या निशाण्यावर आहे.
संजू सॅमसनचे आज पुनरागमन होणार का?
लागोपाठच्या पराभवांमुळे कर्णधार श्रेयस अय्यर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि टीम मॅनेजमेंट सध्या जोरदार टीकेचे धनी ठरत आहेत. संजू सॅमसनला प्लेइंग 11 मधून बाहेर केल्यामुळे चाहते कमालीचे नाराज होते, अगदी गंभीरसमोर संजू-संजूच्या घोषणाही देण्यात आल्या. आता खराब फॉर्ममुळे उपकर्णधार तिलक वर्माला ड्रॉप केले जाण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच्या जागी संजू सॅमसनचे संघात पुनरागमन होऊ शकते.
संजू सॅमसनने टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सर्व सामने न खेळूनही प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा किताब पटकावला होता. त्यानंतर आयर्लंडमधील 2 सामने आणि इंग्लंडविरुद्धचा पहिला टी-20 सामना तो खेळला, पण दुर्दैवाने त्याची बॅट चालली नाही. वैभव सूर्यवंशीला जागा देण्यासाठी संजूला डावलण्यात आले होते, पण आता तिलकच्या खराब फॉर्ममुळे संजूसाठी प्लेइंग-11 चे दरवाजे पुन्हा उघडताना दिसत आहेत.
वरुण चक्रवर्तीला डच्चू मिळण्याची शक्यता
फक्त फलंदाजीच नाही, तर भारताच्या गोलंदाजी विभागातही बदल पाहायला मिळू शकतात. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला संघातून बाहेर केले जाऊ शकते, कारण या मालिकेतील दोन्ही सामन्यांत त्याची कामगिरी अत्यंत सुमार राहिली आहे. गेल्या सामन्यात त्याने 3 षटकांत 35 धावा लुटवल्या आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्याच्या जागी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचे संघात पुनरागमन होऊ शकते, जो गरजेच्या वेळी चांगली फलंदाजीही करू शकतो.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (Probable Playing XI):
अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.
हे ही वाचा –