India vs England 4th T20I Free Live Telecast In India : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा अत्यंत महत्त्वाचा सामना आज (9 जुलै) ब्रिस्टलच्या काउंटी ग्राउंडवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघासाठी हा सामना करो या मरो असा असणार आहे. कारण, भारतीय संघ या मालिकेत आधीच दोन सामने हरला आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताला 125 धावांनी मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता, ज्यावर बरीच टीका झाली. त्यामुळे मालिकेतलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला आजचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल.
भारत विरुद्ध इंग्लंड हेड-टू-हेड रेकॉर्ड
2007 मधील त्या ऐतिहासिक सामन्यापासून हे दोन संघ एकूण 33 वेळा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. यापैकी भारताने 18 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने 14 सामने जिंकले आहेत. इंग्लंडमध्ये दोन्ही संघांमध्ये 12 सामने झाले आहेत, ज्यापैकी भारताने फक्त 4 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने 7 सामन्यांत बाजी मारली आहे.
पिच रिपोर्ट अन् हवामानाचा अंदाज
ब्रिस्टलची खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप अनुकूल मानली जाते. येथे चेंडू बॅटवर चांगला येतो, त्यामुळे हा सामना हाय-स्कोरिंग होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना स्विंग आणि सीमची मदत मिळू शकते. तसेच ‘एक्यूवेदर’च्या अहवालानुसार, 9 जुलैला ब्रिस्टलचे हवामान पूर्णपणे स्वच्छ राहील. येथील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसामुळे सामन्यात कोणताही व्यत्यय येणार नाही आणि चाहत्यांना पूर्ण सामना पाहायला मिळेल.
सामना कधी आणि कुठे पाहता येणार? (Live Streaming Details)
हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10:00 वाजता सुरू होईल, तर सामन्याचा टॉस रात्री 9:30 वाजता होईल. भारतात या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्क (Sony Sports Network) वर केले जाईल. मोबाईल किंवा डिजिटलवर हा सामना जिओहॉटस्टार (JioHotstar) ॲपवर लाईव्ह स्ट्रीम केला जाईल.
भारतात FREE मध्ये कसा पाहायचा लाईव्ह सामना?
जर तुम्हाला हा सामना टीव्हीवर अगदी मोफत पाहायचा असेल, तर डीडी फ्री डिश वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत आणि इंग्लंडमधील हा चौथा टी-20 सामना तुम्ही डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर मोफत पाहू शकता.
हे ही वाचा –