Shadashtak Yog 2026 : 13 जुलैला येणार भयानक संकट! षडाष्टक योगामुळे अडचणीत येतील ‘या’ राशी; वेळोवेळी मिळणार धोक्याची घंटा


Shadashtak Yog 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा एखादा योग किंवा राजयोग जुळून येतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर पाहायला मिळतो. द्रिक पंचांगानुसार, येत्या 13 जुलै 2026 रोजीचा दिवस ज्योतिष शास्त्रात फार महत्त्वाचा मानला जाणार आहे. या दिवशी एक षडाष्टक योग नाही तर तब्बल दोन षडाष्टक योग निर्माण होणार आहेत. हा एक अशुभ संयोग मानला जातो. या दिवशीचा पहिला षडाष्टक योग संध्याकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर दुसरा षडाष्टक योग रात्री 10 वाजून 13 मिनिटांनी बनणार आहे. ग्रहांच्या या उलट्या चालीमुळे काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

ग्रहांच्या या स्थितीमुळे तुमच्या स्वभावावर याचा परिणाम होईल. तुमच्या रागावर तुमचा ताबा राहणार नाही. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर तुमचे वादविवाद होतील. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग तुमच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम करु शकतो. या काळात कोणत्याही प्रकारची पैशांची गुंतवणूक करु नका. पैसे खर्च करताना काळजी घ्या. तसेच, जोडीदाराबरोबर तुमचे वादविवाद होऊ शकतात. 

कन्या रास (Virgo Horoscope)

षडाष्टक योगामुळे तुम्हाला मानसिक ताणाचा सामना करावा लागू शकतो. तुमची कामे अचानक रखडू शकतात. यामुळे तुमची सतत निराशा होऊ शकते. अशा वेळी धैर्याने काम करा. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात सावध राहण्याची गरज आहे. विशेषत: तुमच्या शत्रूवर नीट लक्ष ठेवा. तुमच्या विरोधात कटकारस्थान रचलं जात नाहीये ना याची काळजी घ्या. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुमची अनेक कामे होणार नाहीत. तसेच, कोणतेही महत्त्वाचे निर्णय या कालावधीत घेऊ नका. पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. 

हे ही वाचा :                                                                                                                                                                                          

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Guru Asta 2026 : 14 जुलैची तारीख लक्षात ठेवा! गुरु ग्रहाच्या अस्ताने या राशींवर होणार मोठ्ठा परिणाम; नोकरी आणि आर्थिक स्थिती नेमकी कशी असेल?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *