Gold Silver Price Today: देशभरातील सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत (Gold Price) घसरण सुरूच असून, ग्राहकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. काल सोन्याच्या दरात 1904 रुपयांची मोठी घसरण झाल्यानंतर, आज पुन्हा एकदा किमती 1368 रुपयांनी घसरल्या आहेत. मात्र, दुसरीकडे चांदीच्या दरात (Silver Prices) मोठी वाढ पाहायला मिळत आहे. चांदी एकाच दिवसात तब्बल 3000 रुपयांपेक्षा जास्त महागली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर, COMEX वर सोन्याचे दर खालच्या पातळीवरून सावरले असून, ते 0.63 टक्क्यांच्या वाढीसह 4151.80 डॉलर प्रति औंस या पातळीवर व्यवहार करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा झाली असली, तरी देशांतर्गत बाजारात मात्र सोन्याच्या दरात घट झाली आहे.
Gold Price Today: सोन्याचे आजचे दर
देशांतर्गत सराफा बाजारात आज सोन्याचे दर कालच्या तुलनेत 0.93 टक्क्यांनी घसरले आहेत. आज देशात 10 ग्रॅम सोन्याचा सरासरी भाव 1,45,900 रुपये आहे. काल हाच भाव 1,47,268 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. म्हणजेच आज सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 1368 रुपयांची घसरण झाली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,45,650 रुपयांवर उघडला, जो राष्ट्रीय सरासरीपेक्षा 250 रुपयांनी कमी आहे. जर तुम्ही हलके दागिने घेण्याचा विचार करत असाल, तर 18-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1026 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आज 18-कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,09,425 रुपये आहे.
Reasons Behind Falling Gold Prices: भारतात सोन्याचे दर का घसरत आहेत?
– भारतात सध्या लग्नसराईचा हंगाम संपला आहे. त्यातच सोन्याचे दर सतत घसरत असल्याने बाजारात आणखी घसरण होईल अशी भीती लोकांमध्ये आहे. त्यामुळे लोक सोने खरेदी करण्याऐवजी स्वतःजवळील जुने सोने विकून रोख रक्कम गोळा करत आहेत. यामुळे बाजारात सोन्याचा पुरवठा वाढला आहे आणि मागणी कमी झाल्याने दर घसरत आहेत.
– सरकारने नुकतीच सोन्यावरील कस्टम ड्युटी 6 टक्क्यांवरून थेट 15 टक्के केली आहे. तसेच नागरिकांना पुढील एक वर्षासाठी सोने खरेदी पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. यामुळे ग्राहक खरेदी टाळत आहेत.
– आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत होत असल्याने देखील सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे.
Silver Price Today: चांदीच्या किमतीत उसळी
एकीकडे सोन्याचे दर घसरत असताना चांदीने मात्र ग्राहकांना झटका दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात COMEX वर चांदी 1.12 टक्क्यांच्या वाढीसह 61.75 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. याचा परिणाम म्हणून देशांतर्गत सराफा बाजारात चांदीच्या दरात 1.35 टक्क्यांची मोठी उसळी पाहायला मिळाली. आज चांदीच्या किमतीत प्रति किलो 2091 रुपयांची वाढ झाली असून, आता चांदीचा दर 2.32 लाख रुपये प्रति किलो ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!