फक्त व्याजातून होणार 5 लाखांची कमाई; पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, जाणून घ्या कॅल्क्युलेशन – Marathi News | Post office schemes national saving certificate earn more than 5 lakh only by interest latest investment update


केंद्र सरकारने जुलै-सप्टेंबर 2026 तिमाहीसाठी अल्पबचत योजनांवरील व्याजदर जाहीर केले आहेत. नव्या घोषणेनुसार व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याज 7.7 टक्के इतकेच राहणार आहे. या सरकारी योजनेच्या माध्यमातून फक्त व्याजातून ५ लाख रुपयांहून अधिकची कमाई होऊ शकते. त्यासाठी योजनेचं कॅल्क्युलेशन जाणून घ्या.

प्रत्येक गुंतवणूकदार चांगल्या परताव्यासाठी योजनेत पैसे गुंतवत असतो. अशा अनेक गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या विविध योजना प्रसिद्ध आहेत. पोस्टाकडून लहान मुले, वृद्ध, तरुण, कामगार आणि महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. पोस्ट ऑफिसच्या योजनेत परताव्याची गॅरंटी असते. तशीच आपली गुंतवणूक रक्कम देखील सुरक्षित राहते.

मागील काही वर्षांपासून पोस्टाची नॅशनल सेव्हिंग सर्टिफेकट म्हणजेच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राची गुंतवणूकदारांमध्ये जोरदार चर्चा आहे. या योजनेत तिमाहीचा व्याजदार 7.7 टक्के इतका स्थिर ठेवण्यात आला आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते. तसेच योजनेचा मुदत कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित गुंतवणूकदाराच्या खात्यात योजनेचा लाभ जमा केला जातो. यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही संपूर्ण योजना मुदत कालावधी पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवली पाहिजे.

व्याजातून होणार 5 लाखांची कमाई 

योजनेत गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गुंतवणूक आणि नफा कमावू शकता. तुम्ही या योजनेत 10 वर्षांखाली मुलाच्या नावानेही खाते उघडू शकतात. या योजनेत तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत प्रति वर्ष 1.5 लाखापर्यंत कर बचतीचा लाभ मिळवू शकता. तुम्ही 5 वर्षांच्या काळात व्याजातून 5 लाखांची कमाई करू शकता. यासाठी आधी योजनेचे गणित समजून घेऊयात. तुम्हाला संबंधित योजनेअंतर्गत खाते उघडून 11.50 लाख रुपये गुंतवावे लागतील. त्यानंतर योजनेचा 5 वर्षांचा मुदत कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुमची रक्कम 16.66 लाख रुपये इतकी होईल . यामुळे फक्त चक्रवाढ व्याजासह मिळणारे व्याज 5,16,389 रुपये इतके होतील. ही केवळ फक्त व्याजाची रक्कम असेल.

तत्पूर्वी, तुम्ही या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही ठराविक रक्कम निवडू शकता. या योजनेत मुदतपूर्व कालावधीत खाते बंद करण्याचा पर्याय उपलब्ध नसतो. तसे केल्यास गुंतवणूकदारांना त्याचा काही प्रमाणात फटकाही बसतो. तुम्ही या योजनेत सलग एक वर्षानंतर खाते बंद केल्यास तुम्हाला फक्त गुंतवलेली रक्कम पुन्हा मिळेल, त्यावरील व्याज मिळणार नाही. तुम्हाला योजनेचा लाभ मिळवायचा असेल, तर खाते 5 वर्ष चालू ठेवावे लागेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *