वीकेंड होईल खराब, सिंहगडावर जाण्याआधी ही बातमी वाचा, पायरीमार्गावर दरड कोसळली | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

पुण्यातील ऐतिहासिक आणि पर्यटकांचं आवडतं ठिकाण असलेल्या किल्ले सिंहगडावरून एक मोठी बातमी समोर आली आहे.

singhgad fort News
singhgad fort News

अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: पुण्यातील ऐतिहासिक आणि पर्यटकांचं आवडतं ठिकाण असलेल्या किल्ले सिंहगडावरून एक मोठी बातमी समोर आली आहे. सिंहगड किल्ल्याच्या पायरी मार्गावर अचानक दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र प्रशासनाने पर्यटकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

पहिल्या दरवाज्याजवळ घडली घटना

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दरड कोसळण्याची ही घटना किल्ले सिंहगड वरील पहिल्या दरवाज्याजवळ घडली आहे. गडावर सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने हा प्रकार घडला आहे. डोंगराचा काही भाग आणि दगड थेट पायरी मार्गावर अडथळे निर्माण झाले आहेत.

पावसाचा जोर वाढला; पर्यटकांना प्रशासनाचे आवाहन

सध्या संपूर्ण पुणे जिल्हा आणि घाट माथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. सिंहगड किल्ल्यावरही पावसाचा जोर प्रचंड वाढला असून धुकं आणि निसरड्या रस्त्यांमुळे धोका वाढला आहे. दरड कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर, “गडावर येणाऱ्या सर्व पर्यटकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे,” असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आलं आहे.

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

पावसाळ्याच्या दिवसांत वीकेंडला आणि इतर दिवशीही सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. अशात दरड कोसळल्याची घटना घडल्याने पर्यटकांनी पुढील काही दिवस सिंहगडावर येणं टाळावं किंवा सिंहगडावर आल्यास योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. तूर्तास या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसून पायरी मार्गावरील दगड हटवले जात आहेत.

मराठी बातम्या/पुणे/

वीकेंड होईल खराब, सिंहगडावर जाण्याआधी ही बातमी वाचा, पायरीमार्गावर दरड कोसळली



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *