Ketan Agrawal Case : केतन हत्याकांड, चेतनच्या आई-वडिलांवर आलीये अत्यंत वाईट वेळ, दुकान बंद, गुपचूप राहतायेत अशा ठिकाणी – Marathi News | Ketan Agrawal Case chetan chaudhary parents facing a terrible time shop closed stay at their relatives house


Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता वेगळ वळण लागलं आहे. केतन याच्या कुटुंबियांनी सियावर गंभीर आरोप केले, सियाच्या कुटुंबियांनी आमची मुलगी गुन्हेगार असेल तर, तिला देखील किल्ल्यावरुन ढकलून द्या…अशी भूमिका मांडली आहे. तर सियाचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याच्या आई – वडिलांवर  तर घर सोडून जायची वेळ आली आहे. मुलांच्या कृत्याचे भोग आणि चेतनचे आई – वडील भोगत आहेत. त्यांचं किराणा दुकान देखील गेल्या काही  दिवसांपासून बंद आहे. मिळालेल्या  माहितीनुसार,  चेतन याचे आई – वडील स्वतःचं हक्काचं सर्वकाही सोडून नातेवाईकांच्या घरी राहत आहेत.

सांगायचं झालं तर, पुण्यातील  ‘मार्केट यार्ड’ परिसरात चेतनचे वडील बाबूलाल सीरवी यांचे दुकान आहे. पण हे दुकान 25 जून पासून बंद आहे. घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर लोकांकडून होत असलेली टीका आणि संताप यामुळेच चेतनच्या कुटुंबियांनी दुकान आणि घर सोडण्याचा निर्णय  घेतला. रिपोर्टनुसार, चेतनचे  कुटुंबिय आता अत्यंत हलाखीच्या आणि भीतीपोटी एका नातेवाईकांच्या घरी आहेत…

सियाने केतनकडून घेतलेले 1 कोटी रुपये 

पोलीस केतन हत्याकांडाची कसून चौकशी करत आहेत. चौकशी दरम्यान असं  समोर आलं की, सियाने  हिने  होणारा पती केतन याच्याकडून 1 कोटी रुपये घेतले होते. रिपोर्टनुसार, सियाला तीन वर्षांनंतर बॉयफ्रेंड चेतन याच्यासोबत लग्न करायचं होतं. अशात योजनेनुसार, सियाने शॉपिंगचं कारण सांगत केतन याच्याकडून तब्बल 1 कोटी रुपये घेतले आणि थेट चेतन याला दिले.  याच पैशांमधून  चेतन स्वतःचा व्यवसाय सुरु करणार होता.

मिळालेल्या माहितीनुसार, चेतन याने सियाला विश्वासात घेतलं आणि सांगितलं, पैसे मिळाल्यानंतर स्वतःच्या पायांवर उभा राहील, त्यासाठी कमीत कमी तीन वर्ष लागतील… सिया आणि चेतन यांची योजन अशी होती की, केतन याच्या मृत्यूनंतर चेतन स्वतः सियाच्या कुटुंबियांना भेटणार होता आणि लग्नासाठी सियाच्या आई – वडिलांना विचारणार होता.

केतनची बहीण आणि सियाचा भाऊ यांचं लग्न

पोलिसांच्या चौकशीत समोर येत असलेल्या माहितीनुसार, लग्न फक्त  केतन आणि सिया यांचंच होणार  नव्हतं तर, केतनची बहीण आणि सिया हिचा भाऊ साहिल यांचं देखील  लग्न  ठरलं होतं. नोव्हेंबर महिन्यात केतन – सिया यांचं लग्न  होणार होतं. त्यानंतर तनची बहीण आणि सिया हिचा भाऊ साहिल यांचं लग्न पार पडणार होतं…  सध्या  पोलीस  याप्रकरणाची  कसून चौकशी  करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *