52 वर्षांच्या राम कपूरने ओलांडल्या सर्व मर्यादा; 24 वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला बळजबरी केलं किस, भडकले युजर्स – Marathi News | Ram Kapoor slammed for kissing co contestant Varun Laila Yadav in Lock Upp 2


‘लॉक अप सिझन 2’ या सेलिब्रिटी रिअॅलिटी शोच्या पहिल्या काही भागांवरूनच वाद आणि टीकेला तोंड फुटलंय. या शोमधील स्पर्धकांमध्येही वाद आणि शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. यामध्ये टेलिव्हिजन आणि सोशल मीडियावर काही चर्चेतल्या सेलिब्रिटींनी भाग घेतला आहे. त्यापैकी अभिनेता राम कपूर त्याच्या वागण्यामुळे तुफान चर्चेत आला आहे. आधी तो सूत्रसंचालक रितेश देशमुखसोबत उद्धटपणे वागला, त्यानंतर त्याने लग्नातील फसवणुकीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. आता तो थेट इन्फ्लुएन्सर वरुण उर्फ लैला यादवला बळजबरीने किस केल्यामुळे वादाच्या भोवऱ्याच सापडला आहे. 52 वर्षीय राम कपूरच्या अशा वागण्यावरून सोशल मीडियावर बरीच टीका होत आहे.

शोमध्ये राम कपूर आणि वरूण हे इतर काही स्पर्धकांसोबत बागेत बसून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि नात्यांबद्दल चर्चा करत असतात. राम वयाच्या तिशीत लग्न करून संसार थाटण्याबद्दल बोलत असतो, तेव्हा वरुण मस्करीत म्हणतो, “रामने नंतर वयाच्या चाळीशीत फसवणूक केली.” हे ऐकून राम त्याच्या शेजारी बसलेल्या वरुणला मिठीत घेतो आणि गालावर किस करतो. तो इथवरच थांबत नाही, तर त्याला तो पुढे लिप-टू-लिप करताना दिसतो. रामने त्याला खरं किस केलं की कॅमेऱ्यामध्ये फक्त तसं दाखवलं गेलं, हे मात्र स्पष्ट झालं नाही. मात्र त्याला असं वागताना पाहून बाजूला बसलेले सुनीता अहुजा आणि आकांक्षा चमोला यांना आश्चर्याचा धक्काच बसतो.

पहा व्हिडीओ-

हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ‘वरुण यादव उर्फ लैला त्याच्यापेक्षा खूपच लहान, जवळपास निम्म्या वयाचा आहे. त्याचं 52 वर्षीय रामने जबरदस्तीने चुंबन घेतलं. लैलानेही त्याला कोणताही विरोध केला नाही, उलट मूक संमती दिली. आपल्या वयाचा आणि पदाचा गैरवापर केल्याबद्दल राम कपूरला लाज वाटायला हवी’, असं एकाने म्हटलंय. तर ‘स्पष्ट संमतीशिवाय त्याला चुंबन घेण्याचा कोणताही अधिकार नाही. हे वर्तन अस्वीकार्य आहे. शोमधील नाटकीपणा असला तरी संमती महत्त्वाची असते’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘राम कपूरने वरुणवर एकप्रकारे लैंगिक अत्याचारच केला. हा शो अतिशय फालतू आहे’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी टीका केली आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *