दुसऱ्या दिवशी इतकी वाईट बातमी येईल असं वाटलंच नव्हतं, एकाच चितेवर नवरा बायको आणि दोन मुलं… काळीजच हादरलं… – Marathi News | Rajasthan Family End Life Financial Crisis Leads to Heartbreaking Tragedy


राजस्थानच्या पाली येथील फलोदी जिल्ह्यातील देचूमध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने अख्खं राज्यच हादरून गेलं आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही सामूहिक आत्महत्या आहे. गेनाराम पटेल आणि त्याची पत्नी पुष्पा देवी, तसेच दोन मुले किशन (वय १०) आणि मुलगी खूशबू (वय १३) यांचे मृतदेह आढळून आले आहेत. गेनाराम याने गळफास घेतला तर पत्नी आणि दोन मुलांचे पार्थिव खाटेवर आढळून आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

गेनाराम हा मूळचा रोहट क्षेत्रातील बीटू गावचा रहिवाशी होता. गेल्या चार वर्षापासून हे कुटुंब देचू येथे शेती करत होतं. शेती हेच या कुटुंबाच्या अजीविकेचं साधन होतं. नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या मते, गेल्या काही वर्षापासून या कुटुंबाला आर्थिक चणचणी होत्या. त्याची पत्नी पुष्पा देवी गेल्या काही वर्षापासून मानसिक आजाराने ग्रस्त होती. तिच्यावर उपचारही सुरू होते. कुटुंबाची आर्थिक स्थिती ठिक नव्हती. तर गावाकडे गेनाराम याच्या वयोवृद्ध वडिलांना लकवा मारलेला होता. तर लहान भाऊ दिव्यांग होता. त्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी गेनाराम याच्यावरच होती.

आधीच तणावात…

त्यामुळेच गेनाराम गेल्या काही वर्षापासून मानसिक तणावात होता. घटनेच्या आदल्या दिवशी गेनाराम हा कुटुंबासह त्याच्या मूळ गावी म्हणजे बीटूला गेला होता. तिथे गेल्यावर त्याने कुलदेवतेची पूजा केली. कुटुंबाच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर तो परत शेतावर परतला होता. दुसऱ्या दिवशी इतकी भयंकर बातमी मिळेल याची कुणाला खबरही नव्हती. दरम्यान, एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचं कळल्यानंतर पोलीस, फलोदी एसपी आणि फॉरेन्सिक टीमचं पथक घटनास्थळी दाखल झालं.

एकाच चितेवर

घटनास्थळावरून सर्व साक्ष्य पुरावे गोळा करण्यात आले आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले होते. तसेच या प्रकरणी पोलीस सर्वच अँगलने तपास करत आहेत. त्यानंतरच निष्कर्षावर पोलीस पोहोचणार आहेत. मंगळवारी चारही मृतदेह बीटू गावात आणण्यात आले. त्यावेळी अख्खं गाव जमा झालं होतं. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. किंचाळ्या आणि आरडाओरड सुरू होती. त्यामुळे संपूर्ण परिसर शोकाकूल झाला होता. या शोकाकूल वातावरणातच चारही मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यात आले. एकाच चितेवर चौघांना अग्नि देण्यात आला. यावेळी सर्व गाव हेलावून गेला होता. एकाचवेळी चार लोकांची एकाच ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा निघण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *